25 February 2020

News Flash

पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनासाठी जनजागृती

महानगरपालिकेने सहा विभागीय कार्यालयातून अमोनिअम बायोकॉबरेनेट पावडर मोफत उपलब्ध करून दिली आहे.

मूर्ती दान उपक्रम, कृत्रिम तलावांची व्यवस्था

दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाला गुरुवारी निरोप देण्याची लगबग सुरू झाली आहे. गणेश विसर्जन पर्यावरणस्नेही पद्धतीने करून जल प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह पर्यावरणप्रेमी संस्थांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्या अंतर्गत मूर्ती दानसह ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करता यावे म्हणून महानगरपालिकेने सहा विभागीय कार्यालयातून अमोनिअम बायोकॉबरेनेट पावडर मोफत उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने विसर्जनासाठी २६ नैसर्गिक, तर २८ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

मूर्ती गोदावरीत विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. काही हिंदूत्ववादी संघटना वाहत्या पाण्यात मूर्ती दान करण्याचा आग्रह धरतात. दुसरीकडे भाविकांनी पर्यावरणस्नेही पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन अंनिससह अन्य संस्था करतात. जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका पर्यावरणप्रेमी संस्थांच्या मदतीने ठिकठिकाणी मूर्ती संकलन उपक्रम राबविते.

या वर्षीही तशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे अमोनिअम बायोकॉबरेनेटच्या पाण्यात विघटन होते. हे लक्षात घेऊन पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयात ही पावडर मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. विसर्जनासाठी सहा विभागात ३० नैसर्गिक, तर ४६ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली. तसेच मूर्ती आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या मूर्ती महापालिका संकलीत करणार, त्यांचे विधीवत पूजन करून विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान, नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर धबधब्याजवळ ‘निर्माल्यातून फुलाकडे’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.

भाविकांनी निर्माल्य नदीपात्रात टाकू नये. त्यापासून सेंद्रिय खत तयार करता येते. त्यातून घरातील बगीचा फुलविता येईल, याबद्दल माहिती दिली जाणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी सांगितले.

स्टेप फाऊंडेशन आणि गच्चीवरची बाग या संस्थांच्यावतीने निर्माल्य संकलन आणि श्रीफळाचे आवरण जमा करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग पर्यावरणीय कामासाठी करण्यात येणार आहे.

हा उपक्रम गुरुवार आणि शुक्रवारी असे सलग दोन दिवस सोमेश्वर, नवश्या गणपती, गंगापूर गावातील अमरधाम, बालाजी मंदिर येथील धबधबा आणि त्र्यंबक रस्त्यावरील पपया नर्सरीलगत नंदिनी पूल येथे राबविला जाणार आहे.

कृत्रिम तलाव व्यवस्था

 • पंचवटी – पेठ रोडवर आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षनगर, कोणार्कनगर
 • नाशिक पूर्व – रामदास स्वामी मठाजवळ आगरटाकळी, रामदास स्वामीनगर बसथांबा, नासर्डी नदीलगतचा शिवाजी वाडी पूल, साईनाथनगर चौफुली इंदिरानगर, कलानगर चौक, इंदिरानगर, राजीवनगर शारदा शाळेजवळ.
 • सातपूर – सोमेश्वर मंदिर परिसर, शिवाजीनगर, अंबिका स्वीटशेजारी अशोकनगर, पाईपलाईन रस्त्यावर रिलायन्स पंपाशेजारी
 • नाशिकरोड – जेतवननगर जयभवानी रस्ता, शाळा क्रमांक १२३ चे मैदान, चेहेडी ट्रक टर्मिनस, जेलरोडवरील नारायण बापू चौक
 • नाशिक पश्चिम – चोपडा लॉन्स पूल परिसर, चव्हाण कॉलनी (परिची बाग), वन विभाग रोपवाटिका पूल, बॅडमिंटन हॉल येवलेकर मळा, उंटवाडी रस्त्यावरील दोंदे पुलालगत, महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ, लायन्स क्लब मैदान जुनी पंडित कॉलनी.
 • सिडको – राजे संभाजी स्टेडिअम अश्विननगर, डे केअर  सेंटर  शाळेजवळ, जिजाऊ  वाचनालय गोविंदनगर, पवननगर स्टेडिअम.

नैसर्गिक ठिकाणे

 • पंचवटी – रामवाडीत चिंचबन, गोदापार्क, म्हसरुळमध्ये सीता सरोवर, वाघाडी नदीवर राजमाता मंगल कार्यालय, नांदूर, मानूर गोदाघाट, तपोवनात कपिला संगम, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण.
 • नाशिक पूर्व – लक्ष्मीनारायण घाट, शितळादेवी मंदिर, टाळकुटेश्वर घाट, टाकळी पूल संगम.
 • सातपूर – आनंदवल्ली-चांदसी पुलाखाली, सोमेश्वर धबधबा, अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदी पूल, मते नर्सरी पूल, आयटीआय पुलाशेजारी गणेश घाट.
 • नाशिकरोड – चेहेडी दारणा नदी घाट, वालदेवी नदी विहितगाव, देवळाली गाव, वडनेरगाव पंपिग जवळ, दसक घाट राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज पुलाजवळ.
 • नाशिक पश्चिम – यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिध्देश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमानघाट, अशोकस्तंभ.

First Published on September 12, 2019 1:35 am

Web Title: eco friendly ganesh visarjan artificial lake akp 94
Next Stories
1 महापोर्टलमार्फत होणाऱ्या  परीक्षेविरोधात मोर्चा
2 हजारो वीज ग्राहकांना तडजोडीची संधी
3 ‘मेट्रो निओ’साठी १४६५ कोटी कर्ज स्वरूपात
Just Now!
X