डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या बंदोबस्तात वाढ

नाशिक :  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर गुरुवारचा दिवस प्रशासनासह रुग्णालय व्यवस्थापनाचा संयम पाहणारा ठरला. दुसरीकडे, बुधवारच्या घटनेमुळे रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्याचे कामही कर्मचाऱ्यांना करावे लागले.  प्राणवायू टाकीतील गळतीमुळे रुग्णालयातील २४ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर  व्यवस्थापनासह प्रशासनावर गंभीर आरोप झाले. परिस्थिती अधिक बिघडू नये, यासाठी गुरुवारी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Gold and Silver Price Today
Gold-Silver Price on 4 April 2024: सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढ; चांदीही ७९ हजार रुपयांच्या पुढे, पाहा आजचा भाव 
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलही मदतीला आहे. बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू पुरविणाऱ्या मुख्य टाकीला झालेल्या गळतीमुळे अनेक नातेवाईक आपल्या आप्तांना गमावून बसले.

वास्तविक वर्षभर डॉ. हुसेन रुग्णालय हे करोना रुग्णांसाठी संजीवनी देणारे ठरले. बिटको तसेच डॉ. हुसेन रुग्णालयात कायमच रुग्णांची गर्दी राहिल्याने येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सातत्याने कामाचा ताण येत आहे. बुधवारी अपघात झाल्याचे लक्षात येताच रुग्ण वाचावे यासाठी डॉक्टर, कर्मचारी यांनी करोना संसर्गापेक्षा रुग्णांच्या जीविताला महत्व दिले. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जे शक्य ते सर्व के ले.

गुरुवारी पुन्हा रुग्णालयातील कामकाज सुरू झाल्यावर आदल्या दिवशीच्या दुर्घटनेची चिंता  वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर कायम होती. त्यांच्यावरील ताण अधिकच वाढलेला होता. रुग्णालयाच्या ज्या सी कक्षात बुधवारी मृत्युतांडव झाले, त्या ठिकाणी जाण्याचे धाडस अनेकांना झाले नाही. मन कठीण करत डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी आपले नियमित काम सुरू के ले.  या वेळी रुग्णांचे प्रश्न, नातेवाईकांकडून प्रकृतीविषयी होणारी विचारणा यास उत्तर देत असताना कर्मचारी तसेच अधिकारी वर्गाला आपली घालमेल लपवता आली नाही.

कर्मचारी, रुग्ण किं वा पोलीस असो, प्रत्येकाच्या बोलण्यात बुधवारच्या घटनेचा संदर्भ येत होता. अशी घटना पुन्हा कु ठेही होऊ नये, असेच प्रत्येकाचे मत होते. या घटनेची चौकशी तर होईलच, परंतु यापुढे तरी प्रत्येक रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशीच प्रत्येकाची भावना आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावना लक्षात घेता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाच्या आवारात भद्रकाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. परिसरात वाहनांना थेट प्रवेश टाळण्यासाठी ठिकठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू करण्यात आली. अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात प्रवेश दिला जात असल्याने रुग्णांचे नातेवाईक आणि बाहेरील सुरक्षारक्षक, पोलीस कर्मचारी यांच्यात वाद होत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयास भेट देण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी मेटल डिटेक्टर लावण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय व्यवस्थापनाकडून केवळ एकाच नातेवाईकाला दवाखान्यात सोडण्यात येत होते.