नाशिकमध्ये पंचवटी महाविद्यालयासमोर गुरूवारी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना घडली. राहुल टाक या नावाचा तरुण गोळीबारात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.