शहर परिसरात लूटमार, घरफोडी, चोऱ्या तसेच टोळी युद्धातून शांततेला मिळणारे आव्हान या घटना पाहता पोलिसांनी गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी शहर आणि जिल्हा परिसरातून भद्रकाली येथील सराईत गुन्हेगार समीर यादवसह त्याच्या टोळीतील २१ सदस्यांना सहा महिन्यासाठी तडीपार करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीही पोलिसांनी २२ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले होते. नवीन वर्षांतही गुन्ह्य़ाचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने पुन्हा एकदा पोलिसांनी तडिपारीचे अस्त्र बाहेर काढले आहे. शहरातील अनेक गुन्ह्य़ांना बळ  देणाऱ्या जुगार अड्डय़ांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या माहितीची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. भद्रकालीतील  गुंड समीर यादव (२१, रा. रमाबाई आंबेडकर नगर) सह त्याच्या टोळीतील अन्य २२ जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली. सहा महिन्यासाठी त्यांना नाशिक शहर व जिल्हा परिसरात प्रतिबंध करण्यात आला आहे. अद्याप २५ सराईत गुन्हेगारांविरूध्द तसेच दोन टोळ्यांमधील २६ सदस्य अशा ५१ गुन्हेगारांवर तडिपारीची कारवाई प्रस्तावित आहे.

यामध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगारांचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हेगारांविरुद्धची कारवाई यापुढेही कायम राहणार असून पुढील टप्पात राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार तडिपारीच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. नाशिक दिंडोरी  रस्त्यावरील  गोळीबार असो की दोन गटात अंतर्गत वादातून झालेली हत्या, अशा विविध घटनांमधून समाजविघातक कारवाई करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र शहर परिसरात आहे.

pimpri Chinchwad , Police Bust Child Trafficking Gang, new born baby Trafficking Gang, Six Women Arrested, child Trafficking gang in pimpri chinchwad, pimpri chinchwad crime news,
धक्कादायक: पिंपरी चिंचवडमध्ये नवजात बालकांची तस्करी करणारी महिलांची टोळी गजाआड; सात दिवसांच बाळ…
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल
Panvel, Violent Clash, Erupts, between two groups, Police Attacked, near karanjade colony, fir register, against 18, crime news,
पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

तडीपार गुन्हेगार

  • तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये गुंड समीर यादव (२१, रा. रमाबाई आंबेडकर नगर), बल्ली सदुई गौतम (२४, रा. शालिमार झोपडपट्टी), हसन वजीर शेख (५१, नाशिकरोड), सुरेश पवार (४०,भारतनगर), फारूक शेख गुलाब (३८,नानावली), सचिन मोरे (२५, पवन नगर), रवी चव्हाण (२६, गंजमाळ), शेख गुलाम महमंद अब्दुल रहेमान (६२, वडाळा रोड), मुक्तार इब्राहिम शेख (६०, भारतनगर), कमलाकर दोंदे (५६, पाथर्डी गाव), तुषार गायकवाड (४२, भद्रकाली), मेहमूद सलीम शहा (४४, मोठा राजवाडा), विनोद राऊत (२५, संजय नगर), रफिक रशिद पठाण (५५, भद्रकाली), अल्ताफ अब्दुल गणी शेख (३३, फुले मार्केट), मोहिन अब्दुल शेख (३३, फुले मार्केट), महमंद रफिक महंमद हुसेन (३५, मायको दवाखान्याजवळ), अकबर ईसाक शेख (४०, खडकाळी), आकाश परदेशी (२२, पंचवटी), साजीद इकबाल पटेल (२७, विहितगाव), कैसरअली महमंद अली सय्यद (६५, आदमशाह बाबा दर्गाजवळ), दत्तु कुबेंडळे (४८, भद्रकाली) यांचा समावेश आहे.