23 April 2019

News Flash

केरळ पूरग्रस्तांसाठी नाशिकच्या शाळांची मदत

केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नाशिकमधून मदतीचा ओघ सुरूच असून शहरातील काही शाळांनी कपडे, रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केली आहे.

मखमलाबाद विद्यालयातर्फे केरळच्या पूरग्रस्तांसाठी कपडे जमा करण्यात आले. त्या प्रसंगी मविप्र संचालक सचिन पिंगळे, शिक्षण अधिकारी एन. एस. पाटील आणि इतर.

कपडे, रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश

केरळ येथील पूरग्रस्तांसाठी नाशिकमधून मदतीचा ओघ सुरूच असून शहरातील काही शाळांनी कपडे, रोख रक्कम तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत जमा केली आहे. ही मदत जमा करण्यात विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असला तरी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही त्यात मोठा वाटा आहे.

*    नाशिप्रमं संकुलतर्फे जिवनावश्यक वस्तूंची मदत

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलातील जु. स. रुंगटा हायस्कूल, पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालय, मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पिंपळदचे माध्यमिक विद्यालय, नाशिक रात्रशाळा यांच्याकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी संस्थेतील सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार मदत जमा करण्यात आली.

*   शिवाजी विद्यालयातर्फे कपडय़ांची मदत

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फेही कपडय़ांची मदत करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, शिक्षणाधिकारी एन. एस. पाटील, आय. टी. आय.चे प्राचार्य, प्राध्यापक, होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष संजय फडोळ, विद्यालयाचे प्राचार्य के. एस. गावले, उपप्राचार्य ए. ए. घोलप, पर्यवेक्षक एच. एस. दरेकर, अभिनवचे मुख्याध्यापक पी. बी. ठाकरे आदी उपस्थित होते.

*    रासबिहारीतर्फे आर्थिक मदत

शहरातील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनाने प्रत्येकी किमान एक रुपया मदत गोळा करुन ७५ हजार रुपये जमा केले. आदित्य अहिरे, अनश्वरा विजयकुमार या विद्यार्थ्यांच्या हस्ते मदतीच्या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. मुख्याध्यापिका बिंदू विजयकुमार या वेळी उपस्थित होत्या.

मखमलाबाद विद्यालयातर्फे केरळच्या पूरग्रस्तांसाठी कपडे जमा करण्यात आले. त्या प्रसंगी मविप्र संचालक सचिन पिंगळे, शिक्षण अधिकारी एन. एस. पाटील आणि इतर.

First Published on September 15, 2018 3:23 am

Web Title: nasik schools help for kerala flood victims