‘नॅब’चा मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रम

सर्वसामान्यांप्रमाणे दृष्टिबाधितांनाही वाचता यावे, त्यांची आकलन क्षमता वाढावी यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड (नॅब) प्रयत्न करत आहे. इयत्ता १२ वीपर्यंत दृष्टिबाधितांसाठी ब्रेल लिपीची पुस्तके असली तरी विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी नॅबने ‘रिडर मशीन’चा पर्याय निवडला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने रिडर यंत्र घेत वाचन समस्येवर तोडगा काढण्यात आला आहे. लवकरच नॅब युनिट मराठी भाषेसाठी स्वतंत्र मशीन मागवत आहे.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

नॅब विविध उपक्रमांद्वारे दृष्टिबाधितांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांची गरज ओळखत सर्वसामान्यांप्रमाणे त्यांनी मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी खास अभ्यासक्रमाची रचना होत आहे. नुकताच नॅबने दृष्टीबाधितांसाठी शिक्षणशास्त्रातील पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू केला. या शिवाय संगीत विषयक वर्ग सुरू आहेत. या सर्व घडामोडीत संस्थेला अडचण येते ती दृष्टिबाधितांपर्यंत माहिती पोहचविण्याची. प्रत्येक वेळी त्यांना त्या त्या विषयाचे ज्ञान देण्यासाठी ते माहितीपत्रक वाचवून दाखविणे, त्याचे स्पष्टीकरण देणे शक्य नाही. तसेच ही मुले जेव्हा नियमीत विद्यापीठातून पदवी, पदविकेचे शिक्षण घेतात, तेव्हा त्यांना ती सर्व पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध नसल्याने त्यांना ही पुस्तके किंवा अपेक्षित माहिती वाचवून दाखवणार कोण, हा प्रश्न आहे. यावर पर्याय म्हणून काही महिन्यांपूर्वी मुक्त विद्यापीठाने इंग्रजी विषयाचे रिडर यंत्र दिले. या यंत्रामुळे विद्यार्थी त्यांना आवश्यक इंग्रजी साहित्य, काही माहिती पत्रके, महत्वाचा इंग्रजी विषयात मजकूर यंत्राच्या माध्यमाने वाचू शकतो. या यंत्रामुळे त्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होत आहे. सध्या नॅबकडे शहरी तसेच ग्रामीण भागातील शिक्षणशास्त्र शाखेशी संबंधित, बाहेरून येणारे शालेय विद्यार्थी यासह अन्य काही नागरिक असे २०० हून अधिक विद्यार्थी आहेत. त्यांना मराठी साहित्य, त्या संबंधित अवांतर वाचन करता यावे यासाठी मराठी भाषेच्या खास यंत्राची मागणी होत आहे. या अनुषंगाने मुक्त विद्यापीठ आणि अन्य संस्थांशी चर्चा सुरू आहे. एका यंत्रासाठी ७५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून नॅबला सध्या दोन यंत्रांची गरज असल्याचे नॅबचे मानद महासचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी सांगितले.

पुस्तक असे वाचले जाते .

दृष्टिबाधितांना पुस्तकातील जे पान वाचायचे आहे, ते पान त्या यंत्रावर प्रथम स्कॅन करावे लागते. स्कॅन केलेले पान काही मिनिटात यंत्राकडून वाचण्यास सुरूवात होते. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि श्रवणशक्ती वाढीस लागून त्यांना जास्तीतजास्त अद्ययावत माहिती मिळण्यास मदत होते.