साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. अजय देवरे यांचे मत

रस्त्यावरील अपघातांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सध्या फार वाढले आहे. युवावर्ग बऱ्याच वेळा हेल्मेट न वापरता वेगाने वाहने चालवतात. समाजाने सकारात्मक मानसिकता धारण केल्यास नाशिकमध्ये अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल, असे मत साहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भानोसे यांनी येथे मांडले.

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून सुरक्षित वाहतुकीसंदर्भात अभिनव योजना मांडण्यात आली. या अभियानात अनेक सामाजिक संस्थानी सहभाग घेतला. गरुडझेप प्रतिष्ठानने सातत्याने १५० दिवस हे अभियान राबविल्याबद्दल डॉ. देवरे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भानोसे यांचा गौरव करण्यात आला. देवरे यांनी गरुडझेपच्या कार्याचे कौतुक केले. वाहतूक सुरक्षेसंदर्भात सातत्यपूर्ण १५० दिवस अभियान राबविणे हे अतिशय चिकाटीचे आणि संयमाचे कार्य आहे.

गरुडझेपने हे काम करून एक आदर्श समाजात उभा केला असल्याचे देवरे यांनी नमूद केले. यावेळी इनामदार, फुलचंद भोये, इतर अधिकारी, वाहतूक पोलीस तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बोर्न टू हेल्पचे आनंद कवळे, सक्षमचे रज्जत शर्मा, नाशिक सायकलिस्टचे सतीश महाजन, समीर भडांगे, शंभर दिवस अभियान पूर्ण करणाऱ्या केरला महिला समितीच्या जया कुरूप, भारतीय मानव अधिकारचे सुनील परदेशी, संतोष धात्रक, सोनाली रसाळ आदींनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी हेल्मेट परिधान करणाऱ्या सर्वाना गुलाबपुष्प आणि पेढे देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने आता सातत्यपूर्ण दोनशे दिवस वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. सूत्र संचालन रंजना ठाकूर यांनी केले. आभार प्रसाद देशपांडे यांनी मानले.