News Flash

श्री सप्तश्रृंगी मंदिरातील गर्भगृह दर्शनास नववर्षांपासून बंदी ; देवस्थानचा निर्णय

या ठरावाचा विचार करून पावित्र्य जपण्यासाठी ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तश्रृंगी देवस्थान मंदिरात एक जानेवारीपासून गर्भगृहातील दर्शन बंद करण्यात आले आहे. केवळ आरती कालावधीत सोवळे नेसून तसेच महिलांनी साडी परिधान केली असल्यास गर्भगृहात दर्शन घेता येणार असल्याची माहिती अतिरिक्त सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिली.

साडेतीन पीठांपैकी अन्य देवी मंदिरात गर्भगृहात दर्शनासाठी जाऊ देण्यात येत नसून श्री सप्तश्रृंगी देवी मंदिरातही पावित्र्य राखले जावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गावकऱ्यांनी ग्रामसभेत या संदर्भात ठराव करून देवस्थानकडे पाठविला. या ठरावाचा विचार करून पावित्र्य जपण्यासाठी ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत अतिविशेष व्यक्तींनाही मंदिरातील आरती, अभिषेक आणि अन्य पूजा व्यतिरिक्त गर्भगृहात दर्शन घेता येणार नाही. श्री सप्तश्रृंगी मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाशी पत्रव्यवहार झाला असून मूर्ती संवर्धनासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 1:01 am

Web Title: shri saptashringi temple sanctum sanctorum visit ban from new year zws 70
Next Stories
1 नववर्षांत महापालिका कर्मचारी संपाच्या तयारीत
2 ग्रहणामुळे पाणीपुरवठा बंद ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करा
3 महिलांची छेड काढणाऱ्या तिघांना अटक
Just Now!
X