News Flash

श्रद्धांजली आणि निषेध

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी शहरासह जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उमटले.

श्रद्धांजली आणि निषेध
मनमाड येथे शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी शहरासह जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उमटले. शाळा, महाविद्यालय, जॉगिंग ट्रॅक, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. पाकिस्तानच्या विरोधात मुस्लीम संघटनाही पुढे सरसावल्या. भद्रकालीत त्यांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी दिली. माजी सैनिकांनी शहीद झालेल्या आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंचवटी, नाशिकरोड भागात सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले. समाजमाध्यमांवर पाकिस्तानच्या निषेधाचा महापूर वहात आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रम स्थगित किंवा रद्द करण्यात आले.

शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रार्थनेआधी वीरमरण पत्करणाऱ्या जवानांना अभिवादन करण्यात आले. बहुतेक जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आलेल्या महिला-पुरुषांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहिदांना अभिवादन केले. जवानांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, अशी मनोकामना व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानविषयीच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून

दिली. भाजपच्या वतीने मध्य-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष देवदत्त जोशी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रविवार कारंजा येथे दुपारी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी

शालीमार येथे पाकिस्तानचा प्रतीकात्मक पुतळा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध केला. अभाविपच्यावतीने शहीद चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शहीद जवानांना अभिवादन करण्यासाठी माजी सैनिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर एकत्र आले. सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने पंचवटी कारंजा येथे मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. आप पक्षाचे पदाधिकारी जीतेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड येथे मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. महापालिकेत पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पश्चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले, उपायुक्त आर. एम. बहिरम यांच्या उपस्थितीत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या वतीनेमहाविद्यालय, कॉलेजरोडपासून गंगापूर रस्त्यावरील शहीद चौकापर्यंत शांततापूर्ण पथसंचलन करण्यात आले. शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मनमाड येथे शिवसेनेच्यावतीने एकात्मता चौकात प्रतीकात्मक पुतळ्यासह पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या.

मुस्लीम संघटना रस्त्यावर

पाकिस्तानच्या निषेधार्थ मुस्लीम संघटना रस्त्यावर उतरल्या. बडी दर्गालगतच्या वाकडी बारव येथे मुस्लीम संघटनांनी पाकिस्तानच्या पुतळ्याला फाशी दिली. भद्रकाली पोलीस ठाण्यालगतच्या मशिदीबाहेर मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2019 12:56 am

Web Title: tribute and protest against terror attacks
Next Stories
1 घंटागाडीच्या गैरकारभाराकडे अधिकाऱ्यांचे बोट
2 ऑनलाइन भाजी-फळे विक्री व्यवसायासाठी ‘अ‍ॅप’
3 बाजार समित्यांमध्ये कांद्याचा महापूर
Just Now!
X