छात्रभारतीची मागणी

नाशिक : करोना संसर्गामुळे विद्यापीठांकडून सर्व परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्कात ५० टक्के  सवलत देण्यात यावी, अशी मागणी  येथील छात्रभारतीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात विद्यापीठाच्या कु लगुरूंना निवेदन देण्यात आले.

करोना महामारी काळात विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठांनी सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रबळ होण्याची गरज विद्यापीठाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. परीक्षा शुल्कात कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही. म्हणजेच ऑफलाईन परीक्षाचां खर्च ऑनलाईनपेक्षाही पाच पटीने जास्त असतो, असे निदर्शनास आले असताही ऑनलाईन परीक्षेच्या नावाखाली अमाप शुल्क विद्यापीठ आकारत  असल्याचे छात्रभारतीचे म्हणणे आहे.

एकूण परीक्षा शुल्कात ५० टक्के  सवलत देण्यात यावी, विद्यार्थ्यांंना शुल्क परतावा करावा, या काळात तरी विद्यापीठाने लूट थांबवावी, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने के ली आहे. या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी छात्रभारती नाशिकचे उपाध्यक्ष देविदास हजारे, शहर संघटक आशिष कळमकर, रोहण पगारे उपस्थित होते.