03 December 2020

News Flash

विविध कार्यक्रमांव्दारे बळीराजा गौरव दिन साजरा

कष्टकरी, बहुजनांचे प्रबोधन आणि जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी बळीराजाचे स्मरण नाशिक : महापुरुषांनी मांडलेला संघर्षाच्या इतिहासाला उजाळा देणे आणि कष्टकरी बहुजनांचे प्रबोधन जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी आवश्यक

(नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात साकारण्यात आलेली बळीराजाची रांगोळी)

कष्टकरी, बहुजनांचे प्रबोधन आणि जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी बळीराजाचे स्मरण

नाशिक : महापुरुषांनी मांडलेला संघर्षाच्या इतिहासाला उजाळा देणे आणि कष्टकरी बहुजनांचे प्रबोधन जनतेच्या मुक्तीदायी चळवळीसाठी आवश्यक आहे. यानिमित्ताने त्यांची वर्ग, वर्ण, जाती आणि लिंगभावविरोधी व्यापक एकजूट उभी करणे यासाठी बळीराजाचे स्मरण बळीराजा गौरव दिनी विविध कार्यक्र मांतून करण्यात आले.

संविधानप्रेमी नाशिककर समितीच्या वतीने बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी बळीराजा गौरव दिन महोत्सवाचे आयोजन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत करण्यात आले आहे. या निमित्ताने बळीराजाची भव्य रांगोळी काढण्यात आली. तसेच ‘संविधान जागर’ हा विद्रोही गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ‘बळीराजाचा इतिहास आणि आज’ या विषयावर परिवर्तनवादी साहित्यिक महादेव खुडे यांनी मार्गदर्शन केले. सिंधुसंस्कृती ही बहुजनांची आद्य स्त्रीसत्ताक कृषक संस्कृती होती. ज्यात स्वातंत्र्य, समता, मित्रता या मूल्यांची जोपासना केली जात असे. या सिंधु संस्कृतीचा महत्तम वारसदार बळीराजा असल्याचे खुडे यांनी सांगितले. बळीराजा गौरव दिन घराघरात साजरा होण्यासाठी शेतकरी, परिवर्तनवादी, संविधानप्रेमी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन मते तर, प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी नेते रमेश औटे, सामाजिक कार्यकत्र्या अनिता पगारे उपस्थित होते. प्रास्ताविक संविधानप्रेमी नाशिककर समितीचे निमंत्रक राजू देसले यांनी केले. याप्रसंगी विद्रोही गीते स्त्रावसी मोहिते, संविधान गांगुर्डे, किरण मोहिते, प्रभाकर वायचळे, सागर निकम आदींनी सादर केली. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी आणि उद्योगधार्जिण्या नव्या कायद्याच्या विरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. त्यासंदर्भातील जनजागृतीविषयक पत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी किसान सभेचे सुनील मालुसरे, अ‍ॅड. प्रभाकर वायचळे, राजू देसले, नितीन मते, रमेश औटे आदी उपस्थित होते. बळीराजाची रांगोळी काढलेल्या आरती कनोजे हिचा सत्कार करण्यात आला.

येवल्यातही सत्यशोधक संघटनेच्या वतीने बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले नगरात झालेल्या कार्यक्र मात प्रारंभी बळीराजा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. रणजित परदेशी हे होते. प्रा. परदेशी, अ‍ॅड.  दिलीप कुलकर्णी, सरोज कांबळे, शिवाजी वाबळे, भगवान चित्ते यांची भाषणे झाली. प्रास्ताविक आनंद चित्ते यांनी के ले. सूत्रसंचालन नितीन संसारे यांनी केले. कार्यक्रमास योगेंद्र वाघ, माणिक आव्हाड, संजय जाधव, रोहिणी चित्ते, संगीत आव्हाड आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:07 am

Web Title: various programs farmer celebrate pride day akp 94
Next Stories
1 कुमारी माता, अनाथ बालकांचा प्रश्न गंभीर
2 तापमान पुन्हा घसरल्याने आजारांची भीती
3 दिवाळीआधीच नाशिककरांना हुडहुडी
Just Now!
X