जळगाव : शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भटक्या कुत्र्यांनी बंद गोठ्यातील ११ बकर्‍यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना जळगावमधील आसोदा रस्त्यावरील वाल्मीकनगर भागात घडली. मालकाचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

जळगावमधील आसोदा रस्त्यावरील वाल्मीकनगर परिसरातील रहिवासी प्रकाश कोळी यांच्या मालकीच्या ११ बकर्‍या शनिवारी रात्री त्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधण्यात आल्या होत्या. मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी गोठ्यात घुसून बकर्‍यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. हा प्रकार रविवारी सकाळी उघड झाला. सर्व बकऱ्या मृत्युमुखी पडल्याचे दिसताच प्रकाश कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना  मोठा धक्का बसला. मोकाट कुत्र्यांमुळे कोळी यांचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कोळी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

1 lakh farmers waiting for crop insurance claim
बुलढाणा: सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षाच! मुख्यमंत्र्यांना साकडे
pregnant woman, jcb, Gadchiroli,
VIDEO : जेसीबीत बसून गर्भवतीने ओलांडला नाला, निकृष्ट रस्त्यांमुळे दुर्गम भामरागड तालुक्यातील नागरिकांचा जीव धोक्यात
Flood, Raigad, rain, Nagothane,
अतिवृष्टीमुळे रायगडात पूरस्थिती; नागोठणे, आपटा, खोपोली परिसराला पुराचा तडाखा
Shaktipeeth Expressway, nagpur goa Shaktipeeth Expressway, Shaktipeeth Expressway facing protest, Land Acquisition in Shaktipeeth Expressway, Environmental Impact of Shaktipeeth Expressway, Financial Burden, vicharmanch article,
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
Poor quality of 15 road works in Pimpri Chief Minister Eknath Shinde confession
पिंपरीतील १५ रस्त्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
Due to heavy rains in Ulhas valley water level of Ulhas Bhatsa Bharangi Kalu rivers has increased
उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास, भातसा, भारंगी, काळू नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Crimes against youth officials of 27 villages for digging potholes and destroying Shilpata road
शिळफाटा रस्त्याची खड्डे खोदून नासधूस केल्याने २७ गावातील युवा पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

हेही वाचा >>>नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

दरम्यान, शहराच्या अनेक भागांत मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. लहान मुलांच्या अंगावर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत. रात्री-अपरात्री मोकाट कुत्र्यांच्या पाठलागामुळे दुचाकीधारकांची अनेक भागातून जाताना पाचावर धारण बसते. मोकाट कुत्र्यांनी अनेकांचे जीव गेले आहेत. एमआयडीसीतील विविध कंपन्यांतून रात्रपाळी करून कर्मचारी, कामगार दुचाकीवरून घरी परतताना मोकाट कुत्री पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना अपघात होतात. तसेच चावाही घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेला वारंवार मोकाट कुत्र्यांच्या समस्यांबद्दल कळविले जाते. कुत्र्यांना पकडण्यासाठी वाहन पाठविण्याची मागणी केली जाते. मात्र, वाहन वेळेवर पाठवले जात नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जळगावकरांकडून केली जात आहे.