रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मदतकार्य

नाशिक : करोना महामारीविरुध्दच्या लढय़ात शहरासह जिल्ह्य़ातील विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, संघटनाही योगदान देत आहेत. करोना संसर्गामुळे रक्तपेढय़ांमध्ये कमी रक्तसाठा असल्याने रक्तदान शिबीर घेण्यात येत आहेत. तसेच कोणी मोफत रुग्णवाहिके ची सेवा उपलब्ध करुन देत आहे. कोणी गृह विलगीकरणात असलेल्या करोनाबाधितांच्या कु टुंबियांना मोफत जेवणाचे डबे देत आहेत.

विठलेश्वर फाउंडेशन

सिन्नर येथे विठलेश्वर फाउंडेशनमार्फत शिंपी गल्लीतील कालिका मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदात्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे ५० पिशव्या रक्त जमा झाले. याप्रसंगी नाशिक येथील नवजीवन रक्तपेढीचे सहकार्य मिळाले. माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगरसेवक पंकज मोरे, विठलेश्वर फाउंडेशनचे अमोल कासार, कांचेश पवार, मनोज भगत आदी उपस्थित होते.

युवा ऊर्जा फाउंडेशन

नाशिकचे नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्फत नाशिककरांच्या कायमस्वरूपी सेवेत मोफत रुग्णवाहिका उपस्थित करण्यात आली आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. तसेच एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यास अमरधाम येथे नेण्यासाठी मोफत वैकुंठरथ उपलब्ध असतो. मृतदेह शवपेटीमध्ये ठेवला जातो. रुग्णवाहिका, शवपेटी, वैकुंठरथ यांना रोज र्निजतूक केले जाते. गाडी चालकास पीपीइ संच असतो. कोणाला रुग्णवाहिका, वैकुंठरथ, शवपेटी लागल्यास फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्याशी ९०११६६७९९९ या क्र मांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बालगणेश फाउंडेशन

बालगणेश फाउंडेशन आणि पोलीस बॉईज मित्रमंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून अभय (भय्या) बोरस्ते यांच्या स्मरणार्थ आयोजित शिबिरात ७० पेक्षा अधिक जणांनी रक्तदान के ले.महापालिके तील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बॉईज मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि युवासेना उपमहानगरप्रमुख विशाल खैरनार यांनी  बालगणेश फाउंडेशन येथे हे शिबीर आयोजित केले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अजय बोरस्ते, विरेंद्रसिंग टिळे, संजय चिंचोरे, आदित्य बोरस्ते, आनंद फरताळे, दीपक हांडगे आदी उपस्थित होते. समता रक्तपेढी नाशिकच्या सहाय्याने आयोजित या शिबिरास नाशिककरांनी प्रतिसाद दिला.

राष्टवादी सामाजिक न्याय

नाशिक शहरात राष्ट्रवादी सामाजिक न्यायच्या वतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सामाजिक न्यायचे शहराध्यक्ष धनंजय निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विधानसभा अध्यक्ष नीलेश जगताप यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सुरक्षित अंतर ठेवत, जास्त गर्दी न करता हे शिबीर घेण्यात आले. रक्तदात्यांची काळजी घेत, योग्य चाचणी करून दात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, मनोहर कोरडे, सज्जन कलासरे, दिलीप दोंदे, मोतीराम पिंगळे, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस</strong>

राष्ट्रवादी  युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन कासव यांनी प्रभाग क्रमांक २६ येथे रक्तदान शिबीर  आयोजित के ले होते. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, विभागीय अध्यक्ष  मकरंद सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी नाशिक रक्तपेढीचे सहकार्य लाभले.  यावेळी राष्टवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रोहित पाटील आणि अन्य  उपस्थित होते.

नाशिक येथील ऊर्जा युवा फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली मोफत रुग्णवाहिका