नंदुरबार : गेल्या वर्षी ईडी आणि आयकर विभागाच्या छापासत्रामुळे चर्चेत आलेला आणि वारंवार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी नाव जोडले गेलेल्या नंदुरबार तालुक्यातील आयान मल्टिट्रेड साखर कारखान्याला गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर आलेले अजित पवार यांनी गुपचूप भेट दिली. सचिन शिनगारे यांच्या मालकीच्या या साखर कारखान्याला माध्यमांना टाळून भेट देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पवार हे सकाळी खान्देश एक्सप्रेसने नंदुरबारमध्ये दाखल झाले. यानंतर शासकीय विश्रामगृहात काही काळ आराम केल्यानंतर ते आपल्या गाडीतून खासगी कामानिमित्ताने बाहेर गेले. यावेळी पोलीस ताफा अथवा कुठलाही लवाजमा त्यांच्या समवेत नसल्याने अजित पवार गेले तरी कुठे, असा प्रश्न सर्वांना पडला. तालुक्यातील समशेरपूरस्थित आयान मल्टिट्रेड साखर कारखान्यात पवार असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पवार कारखान्यातून आपल्या खासगी गाडीतून बाहेर पडले.  यावेळी त्यांच्या सोबत असलेला पोलीस बंदोबस्त आणि ताफा कारखान्याबाहेरच उभा होता. हा कारखाना पवार यांच्या मालकीचा असल्याचे आरोप याआधी झाले आहेत. अशातच पवार यांनी दौऱ्यादरम्यान या कारखान्याला दिलेली भेट आणि त्यात घालविलेले दिड-दोन तास याविषयी विविध प्रकारची चर्चा सुरु आहे.