scorecardresearch

Premium

धुळे: हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला; अनिल गोटे यांचा आरोप

मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला झाला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

anil ghote
धुळे: हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला; अनिल गोटे यांचा आरोप ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

धुळे- मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि हुकूमशहाला खूश करण्यासाठीच लाठीहल्ला झाला, असा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाजाने लाखोंचे मोर्चे याआधी काढले. परंतु, कुठेही गालबोट लागले नाही. मराठा समाजाच्या या शांततापूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर दगडफेक झाल्याची जालन्याची घटना अविश्वसनीय आहे. मतांच्या लालसेपोटी भाजप जातीय आधारावरील आरक्षणास पाठिंबा देते. आपल्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात शेकडो वेळा कबूल करूनही देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसकट कुणालाही आरक्षण दिले नाही.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने दिलेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल विधी मंडळात चर्चेला येवू दिला नाही. पण त्याचवेळी मराठा आरक्षणाला पाठिंबा देवून २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपली मते सुरक्षित करून घेतली होती. मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन मराठा समाजाचे दिग्गज नेते असतांना पोलीस अमानुष लाठीहल्ला कसे करु शकतात, असेही गोटे यांनी म्हटले आहे.

accused hide on the scaffolding to avoid the police
पुणे : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले
Boyfriend and girlfriend became ATM thieves to get married
नागपूर : प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर
Uttarakhand Violence
उत्तराखंडमध्ये हिंसाचार, वडील-मुलासह सहा जणांचा मृत्यू, १५० पोलिसांसह २५० जण जखमी, देवभूमीत नेमकं काय घडतंय?
mufti salman azhari
मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलिसांवर दगडफेक

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil gote allegation regarding maratha movement lathi charge dhule amy

First published on: 02-09-2023 at 19:08 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×