त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन; अशोक पत्की, श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना संस्कृती वैभव पुरस्कार

प्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके, लेखक पु. ल. देशपांडे तसेच कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील संस्कृती वैभवच्या वतीने २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत त्रिवेणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातून बाबूजी, गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. यानिमित्त संस्कृती वैभव पुरस्काराने ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

amitabh bachchan marathi news, amitabh bachchan lata mangeshkar marathi news
लतादीदींच्या स्वरात मधाची गोडी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भावना
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
arvind kejriwal
अरविंद केजरीवाल यांच्या जन्मगावातील लोक म्हणतायत…

महोत्सवात संगीतकार श्रीधर फडके यांच्यासमवेत अभिनेते संजय मोने, तुषार दळवी आणि इतर कलाकार सहभागी होणार आहेत. महोत्सवात दररोज सायंकाळी साडेपाच वाजता गोविंदनगर येथील त्रिवेणीनगरीत कार्यक्रम होईल. रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या कलावंतांना समर्पित असा हा यंदाचा महोत्सवही रसिकांच्या पसंतीला उतरेल, असा विश्वास संस्थेचे प्रमुख नंदन दीक्षित यांनी व्यक्त केला.

महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते होईल. यानिमित्त विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. त्यात सुधीर फडके, गदिमा आणि पुलंवर आधारित लेख, आठवणी, किस्से, रसिकांच्या कायम संग्रही राहतील. श्रीधर फडके, सुधीर गाडगीळ, राजदत्त, सुनीता तारापुरे यांसह अनेक कलाकारांनी या स्मरणिकेसाठी लेखन केले आहे. यानंतर बाबूजी, गदिमा आणि पुलं या तिघांवर आधारित अक्षर त्रिवेणी या कार्यक्रमाचे सादरीकरण होईल. त्यात अभिनेता संजय मोने, तुषार दळवी, गायक अनिरुद्ध जोशी, नचिकेत लेले, गायिका धनश्री देशपांडे, निवेदिका उत्तरा मोने सहभागी होतील. गाणी, अभिवाचन अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. संगीतकार श्रीधर फडके आणि सहकलाकार गीतरामायणाचे सादरीकरण करतील. विघ्नेश जोशी हे वादन करणार आहेत. विशेष सत्कारामध्ये विलास शिंदे (कृषी), सचिन जोशी (शिक्षण), डॉ. भरत केळकर (आरोग्य) आणि मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (सामाजिक) यांचा समावेश आहे.

आठवणी, किस्से, गप्पाष्टक

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी संस्कृती वैभव पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, श्रीकृष्ण चंद्रात्रे यांना राजदत्त यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बाबूजी, गदिमा, पुलं यांच्या आठवणी आणि किस्से तसेच त्यांच्या अजरामर कलांविषयी गप्पा होतील. पुलंच्या नाटकातील लोकप्रिय संवादिनी वादनाने महोत्सवाचा समारोप होईल.