नाशिक : शहरातील गंगापूररोड या उच्चभ्रू भागात एक भोंदू ज्योतिषी सर्व समस्यांवर उपचार करण्याचे आश्वासन देत फसवणूक करीत होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम आदमी पार्टी यांनी रचलेल्या सापळ्यात हा भोंदू पकडला गेला. गंगापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला  तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगापूर रोड परिसरात भोंदुबाबाकडून ज्योतिष सांगत असल्याची बतावणी करत गरजुंना लुबाडले जात होते. आप तसेच अंनिसने भोंदुबाबाचे प्रताप उघड करण्याचे ठरविले. एका महिलेला मूल होण्यासाठी तोडगा सांगत ५० हजार रुपयांची मागणी भोंदुबाबाने केली. पूजेच्या नावाखाली विनयभंग केला. अंनिस आणि आपच्या लोकांनी संशयित भोंदुबाबाला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.  गणेश जोशी असे या भोंदूचे नाव असुन तो मूळचा मुंदखेडा (ता. जामनेर, जळगाव) येथील रहिवासी आहे. महागडी वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहिराती देऊन फसविणे, असे कामे या बाबाची टोळी करते. देशभर हे फिरत असतात, नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक बदलून त्यांचे फसवणूक करण्याचे काम सुरु असते.  गंगापूर रोडच्या जेहान सर्कल येथे त्याने भाड्याचे कार्यालय घेतले होते. अनेक दिवसांपासून तो त्या ठिकाणी राहुन लोकांना फसवित होता. लोकांच्या श्रध्देचा फायदा घेत तो अघोरी उपचार सांगत लाखो रूपये लुटत होता. आता भोंदूबाबाच्या कार्यालयात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची तपासणी करणे, त्याच्या साथीदारांची माहिती मिळविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhondu baba remanded police custody three days ssh
First published on: 09-09-2021 at 01:39 IST