बिनशेती दाखला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील नरडाण्याच्या मंडळ अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. तक्रारदाराच्या बहिणीची नरडाणा येथे शेतजमीन आहे. ही जमीन तहसीलदारांनी बिनशेती केली आहे. त्याचा दाखला मिळण्यासाठी तक्रारदाराने नरडाण्याच्या मंडळ अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. बिनशेती दाखला देण्यासाठी मंडळ अधिकारी रंजना जोशी यांनी दोन हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम ग्रामपंचायत आवारात स्वीकारत असताना त्यांना अटक करण्यात आली.