‘चिपको’ कार्यकर्त्यांमुळे चार वृक्षांच्या तोडीस प्रतिबंध

पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावर  वृक्षांची अवैधरित्या होणारी तोड रोखण्यात हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांंना यश आले.

नाशिक : पंचवटीतील मखमलाबाद रस्त्यावर  वृक्षांची अवैधरित्या होणारी तोड रोखण्यात हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांंना यश आले. वृक्षतोड होत असल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्यावरणप्रेमींच्या  सजगतेमुळे संबंधितांना चार झाडांऐवजी केवळ फांद्या कापता आल्या. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांंनी आणि परिसरातील जागरुक नागरिकांनी केली आहे.

मखमलाबाद रस्त्यावरील ओमनगरमध्ये लीलावती रुग्णालयामागील भागात एक विकसक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पिंपळाचे झाड तोडण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्याा हा प्रकार घडल्याने हॅशटॅग चिपको चळवळीचे मखमलाबाद येथील कार्यकर्ते भूषण महाजन आणि सहकाऱ्यांनी झाड तोडण्यास विरोध केला. संबंधित व्यक्तींना त्यांचे कृत्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचेही  निदर्शनास आणून दिले. परंतु, त्यांना न जुमानता संबंधित पिंपळवृक्षाच्या काही फांद्या तोडण्यात मग्न होते. दरम्यान गर्दी वाढली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी येऊन संबंधितांना पोलीस ठाण्यात नेले. आणि दोन तासांनी सोडून दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी येऊन तोडलेली लाकडे गोळा करून नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

यासंदर्भात मनपाच्या उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी यासंदर्भात शेती मालकाला नोटीस बजावली जावून दोन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास तक्रोर दाखल केली जाईल, असे सांगितले. पर्यावरणतज्ज्ञ अश्विनी भट यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे झाडांची अवैध तोड केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त के ली. अलीकडेच प्रतिझाड एक लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधीतांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि दंड वसूल करण्यात यायला हवा. तरच इतरांवर जरब बसेल, असे त्यांनी सांगितले.

भूषण महाजन यांनी विभागीय तसेच मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांना घडलेल्या प्रकाराबाबत निवेदन देऊन झाड तोडणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.  हॅशटॅग चिपको नाशिक चळवळीचे प्रमुख आणि उत्तुंग झेप फाउंडेशनचे रोहन देशपांडे यांनी चळवळीची पाळेमुळे राज्यभर पसरल्याचे सांगून नागरिकांनी अधिक जागरूक रहाण्याचे आवाहन केले.

मखमलाबाद रस्त्यावर वटवृक्षाची होणारी तोड चिपको चळवळीतील कार्यकर्त्यांमुळे रोखली गेली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chipko activists cut down four trees ssh

Next Story
मोर्चेकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे कोंडी
ताज्या बातम्या