प्लास्टिक राष्ट्रध्वजावर बंदी असल्याने कापडी ध्वजाला महत्व प्राप्त झाले असून प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर, त्यांची मागणी वाढली आहे. यंदा कापडी ध्वजाच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे खादी भांडारच्यावतीने सांगण्यात आले. प्लास्टिक ध्वजाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे कापडी ध्वजांची मागणी वाढली आहे. तीन वेगवेगळ्या आकारात ध्वज उपलब्ध आहेत. त्यात तीन बाय दोन फूट आकारातील ध्वजाला अधिक मागणी आहे. राज्यात केवळ नांदेड येथील खादी ग्रामोद्योग येथे राष्ट्रध्वज निर्मिती होते. तेथुन राज्यात इतर ठिकाणी ते पाठविले जातात. शहरात कापडी ध्वजाला विशेष मागणी आहे. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी कागदी राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.