जगात सर्वाधिक काळ योगासने करण्यात विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या येथील योग प्रशिक्षिका तथा उद्योजिका प्रज्ञा पाटील यांचा जागतिक योग दिनाच्या पाश्र्वभूमीवर,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आ. प्रा. देवयानी फरांदे आदी उपस्थित होते.

योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रज्ञा पाटील यांनी सलग १०३ तास योगासने करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. १६ जून रोजी पहाटे साडे चार वाजता इगतपुरीस्थित रिसॉर्टच्या सभागृहात या उपक्रमाला सुरूवात केली होती. बैठक, शयन, विपरित शयन आदी स्थितीतील जवळपास २५ आसने त्या रात्रं-दिवस करत होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी सकाळपर्यंत नेटाने १०३ तासाचा टप्पा गाठत त्यांनी गिनीज बुकमध्ये स्थान मिळवले. त्यांच्या कामगिरीने नाशिक व महाराष्ट्राचे नाव जगात पोहोचले. योग दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांचा सत्कार केला.

या प्रसंगी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आ.प्रा. देवयानी फरांदे, वर्षां डांगरीकर, गौरांगी पाटील आदी उपस्थित होते.