वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती; केंद्रापर्यंत जाऊन अनेक जण परत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवळा: देशात आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना करोना लशीची वर्धक (तिसरी) मात्रा देण्यात येत आहे; परंतु अनेक आरोग्य केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी सक्ती केल्याने लस न घेताच त्यांना परतावे लागले. ज्येष्ठांना वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती न करता प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधीक्षकांनी तपासणी करून लसीकरण करावे, अशी मागणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केली आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि इतर आजाराने त्रस्त असणाऱ्या नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने वर्धक मात्रा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे सांगितले आहे. त्यामुळे मात्रा देण्यात येणाऱ्या ठिकाणी सर्व साठी उलटलेल्या नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी झाल्याने अनेकांना लशीसाठी आपल्या खासगी डॉक्टरांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी धाव घ्यावी लागली. वर्धक मात्रा घेण्यास जाणाऱ्या नागरिकांना करोना लशीची दुसरी मात्रा नऊ महिन्यांपूर्वी घेतली असेल तर ते तिसऱ्या मात्रेसाठी पात्र ठरणार आहेत; परंतु पात्र असूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांना मंगळवारी लस मिळाली नसल्याने माघारी परतावे लागले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compulsory medical certification center vaccine ysh
First published on: 12-01-2022 at 02:23 IST