नाशिक : स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीने रामवाडी पूल ते अहिल्यादेवी होळकर पूल यादरम्यान गोदावरी नदीकिनारी निळ्या पूररेषेत सिमेंट काँक्रिटची भिंत बांधलेली आहे.  याविरोधात गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने तक्रार करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासनाने या तक्रोरीकडे दुर्लक्ष के लेले आहे. याविरोधात मंचने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली असता  उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या गोदावरी नदी प्रदूषण मुक्त समितीच्या सदस्यांना पाहणी करण्यास सांगून अहवाल देण्यास बजावले होते. समितीने पाहणी करुन काम थांबविण्याची सूचना के ली होती. परंतु, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश झुगारत स्मार्ट सिटी प्रशासनाने निळ्या पूर रेषेतील सिमेंट काँक्रि टच्या भिंतीचे बांधकाम सुरू ठेवले आहे.

गोदावरी नदी प्रदुषणमुक्त  समितीत निरीचे सदस्य, तज्ज्ञ सदस्य, तक्रारदार यांच्यासह स्मार्ट सिटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी १९ मार्च २०१९ रोजी पाहणी केल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाला काही सूचना के ल्या होत्या. निरी या शासकीय पर्यावरणवादी संस्थेचा खुलासा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सिमेंट काँक्रिटच्या भिंतीचे बांधकाम पूर्णपणे थांबविण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु, उच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या समितीचा आदेश झुगारून स्मार्ट सिटी प्रशासनाने निळ्या पूर रेषेत सिमेंट काँक्रिटच्या भिंतीचे बांधकाम सुरूच ठेवले असून ते काम आता जवळपास पूर्ण होत आहे.

या भिंतीच्या बांधकामास जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, पालकमंत्री छगन भुजबळ  यांनी यापूर्वी पूर्णपणे विरोध करून काम थांबविण्यास सांगितलेले होते. स्मार्ट सिटी प्रशासनाने के लेल्या कामावर आक्षेप घेण्यात आला.  समितीने पाहणी केल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाला आदेशित केलेले असतानाही समितीच्या आदेशाचा भंग करून सिमेंट कॉिंकट्रची भिंत बांधणार्?या स्मार्ट सिटी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, समितीच्या तज्ज्ञ सदस्य डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी भिंतीची पाहणी केल्यानंतर ज्या अभ्यासपूर्ण सूचना केलेल्या आहेत, त्यांची  अंमलबजावणी करण्यात यावी,  स्मार्ट सिटी प्रशासनाने उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत बांधलेली सिमेंट काँक्रिटची भिंत पूर्णपणे काढून टाकण्यात यावी, भिंतीऐवजी पर्यावरणपूरक गॅबियन पद्धतीची भिंत बांधण्यात यावी, आदी मागणी करण्यात आल्या आहेत.

गोदावरी नदीकिनारी महानगर पालिकेने सात ते आठ वर्षांपूर्वी पंचवटी अमरधाम ते लक्ष्मीनारायण पुलापर्यंत जवळपास एक किलोमीटर लांबीची गॅबियन पद्धतीची भिंत बांधलेली आहे. त्या भिंतीची परिस्थिती आजही चांगल्या आणि मजबूत स्थितीत आहे.  स्मार्ट सिटी प्रशासनाकडून एका बाजूला गोदावरी नदीपात्रातून सिमेंट काँक्रिट काढले जाते. आणि दुसऱ्या बाजूला गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत सिमेंट ओतण्याचे काम सुरू असून ही भूमिका स्वार्थी आणि दुप्पटीपणाची असल्याचा आरोप तक्रारदार निशिकांत पगारे यांनी केला.