अश्लिल छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत एका दाम्पत्याने २१ वर्षाच्या युवतीला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संशयिताने पीडितेवर अत्याचार केला. नंतर आर्थिक फायद्यासाठी त्याने ग्राहक पाठवून अत्याचार केले. खुशबू सुराणा आणि परेश सुराणा असे संशयित दाम्पत्याचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याबाबत २१ वर्षाच्या पीडितेने तक्रार दिली. नोकरीच्या शोधार्थ ही युवती शहरात एकटी राहत होती. फेब्रुवारी महिन्यात सुराणा दाम्पत्याशी तिचा परिचय झाला.

हेही वाचा >>> नाशिक: वृध्द दाम्पत्यास मारहाण करुन दागिने, रोख रकमेची चोरी

नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाम्पत्याने दाखविल्याने त्यांचे परस्परांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. एक दिवस या दाम्पत्याने युवतीचे घर गाठून तिला खरेदीला सोबत येण्याचा आग्रह धरला. यावेळी युवती आपल्या घरातील एका खोलीत कपडे बदलण्यासाठी गेली असताना संशयित व त्याच्या पत्नीने आपापल्या भ्रमणध्वनीत तिचे छायाचित्र व चित्रफिती काढल्या. या घटनेस दोन दिवस झाल्यानंतर परेश हा मद्याच्या नशेत युवतीच्या घरी पोहोचला. अश्लिल चित्रफिती समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी देत त्याने बलात्कार केला.

हेही वाचा >>> नाशिक : भरधाव दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळोवेळी हा अत्याचार सुरू असतानाच त्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेगवेगळ्या पुरूषांशी शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले. दहा दिवस हा अत्याचार सुरू होता. संशयित दाम्पत्याचा अतिरेक वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित दाम्पत्यावर शहरातील पोलीस ठाण्यात फसवणुकीसह वेश्या व्यवसाय व मानवी तस्करीसारखे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. पोलीस संशयित सुराणा दाम्पत्याचा शोध घेत आहेत.