शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण झाले. या प्रकरणी भद्रकाली व नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रकाली परिसरातील खान कुटुंबीयांकडे त्यांचा भाचा शाहरुख फकरुद्दीन खान (१२) राहत होता. २९ नोव्हेंबर रोजी घरी कोणी नाही हे पाहून संशयितांनी खाऊचे आमिष दाखवून त्याला पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यावर खान कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली, परंतु तो मिळून आला नाही.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. प्रतापराव आहिरे यांच्या पत्नी परिसरातील कुमावत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल आहे. त्यांच्या देखभालीसाठी मुलगी वैष्णवी (१६) ही सोबत होती. २५ नोव्हेंबर रोजी वैष्णवी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चहा घेऊन येते असे सांगून दवाखान्याबाहेर गेली ती परतलीच नाही.
कोणीतरी तिचे अपहरण केल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2015 रोजी प्रकाशित
वेगवेगळ्या घटनांत दोघांचे अपहरण
शहर परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण झाले.
Written by मंदार गुरव
First published on: 04-12-2015 at 02:22 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime rate increase in nashik