येथील धनश्री टेक्नोक्रॅट्सच्यावतीने १८ व १९ मार्च या कालावधीत किर्लोस्कर जनरेटर्स व इंजिन्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रात किर्लोस्कर जनरेटर्स व इंजिन्स वापरणाऱ्या ग्राहकांना सुटे भाग आणि सेवा पुरविण्याचे काम धनश्री टेक्नोक्रॅट्स करते. किर्लोस्कर सेवा आता ‘कोएल केयर’ झाले आहे. हा बदल तसेच जनरेटर्स व इंजिन्सच्या देखभाल दुरुस्तीची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रस्त्यावरील चोपडा लॉन्स येथे हा मेळावा होईल. मेळाव्यात सोडत, सवलतीच्या योजना, बक्षिसे आदी उपक्रमही राबविले जाणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
धनश्री टेक्नोक्रॅट्सतर्फे ग्राहक मेळावा
येथील धनश्री टेक्नोक्रॅट्सच्यावतीने १८ व १९ मार्च या कालावधीत किर्लोस्कर जनरेटर्स व इंजिन्स वापरणाऱ्या ग्राहकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 18-03-2016 at 01:48 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customer gathering in nashik