जळगाव : पोलीस दल लोकसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त असताना दुसरीकडे जळगाव शहरासह जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. जळगाव आणि जामनेर येथील दोघांना सायबर गुन्हेगारांनी सुमारे १९ लाख रुपयांना फसविल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यात महिला, शिक्षक व आयुर्वेदिक डॉक्टराचीही शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक करण्यात आल्याची तक्रार होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

जळगावमधील आदर्शनगरातील रहिवासी योगेश हेबाळकर (५४) यांची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांत, तर जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील व्यावसायिक विजय भोई (४४) यांची सात लाखांत फसवणूक झाली. खासगी कंपनीत नोकरी करणारे हेबाळकर यांच्या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. त्यानुसार हेबाळकरांकडून १८ डिसेंबर २०२३ ते सात मार्च २०२४ या कालावधीत वेळोवेळी सुमारे १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने विविध बँक खात्यांवर स्वीकारले. त्यानंतर त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कम दिली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही रक्कम परत मिळत नसल्याची खात्री झाल्यानंतर हेबाळकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून एका संस्थेच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकासह अन्य दोन, अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा – जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

जामनेर येथील व्यावसायिक भोई यांच्याशी एकाने संपर्क साधून लिंक पाठवली. त्याद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला थोड्या रकमेची गुंतवणूक केली. त्यात त्यांना २० टक्के मोबदला दिला. त्यामुळे चांगला मोबदला मिळत असल्याने भोई यांना मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्यानुसार २७ मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून एकूण सात लाख रुपये स्वीकारले. मात्र, त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही, तसेच मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे भोई यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा – दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जळगावातील फॉरेस्ट कॉलनीतील रहिवासी शिक्षक अनिल दांडगे (४३) यांना इंडिया वेदरवेन-११ या ग्रुपवरील डॉ. आर्यन रेड्डी व नीता मोदी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून आलेल्या लघुसंदेशामुळे विश्‍वास संपादन करीत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने १८ डिसेंबर २०२३ ते आतापर्यंत तब्बल ३४ लाख १६ हजारांना, तसेच रावेर तालुक्यातील निंबोल येथील आयुर्वेदिक डॉ. पंकज पाटील (४४) यांना सायबर गुन्हेगारांनी हेरत त्यांच्या समाजमाध्यमातील अकाउंटवर लिंक पाठवत १९ डिसेंबर २०२३ ते दोन फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेअर बाजारात गुंतवणूक वाढवत २० लाखांची रक्कम उकळली. ३० मार्चला शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषातून शहरातील हरेश्‍वरनगर परिसरातील रहिवासी सोनल उपलवार (३४) यांना सुमारे एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांत गंडविले. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.