जळगाव : शहरातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात पहिल्या वर्षातील विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात पहिल्या वर्षात करुणा बोदडे (२२, वडोदा, ता. यावल, हल्ली मुक्काम दीक्षितवाडी, जळगाव) ही शिकत होती. दीक्षितवाडी परिसरात भाडेतत्त्वावरील खोलीत तिच्यासह तिच्या तीन मैत्रिणी वास्तव्यास होत्या. त्यांपैकी दोन मैत्रिणी आपापल्या गावाला गेल्या होत्या. एक मैत्रीण बाहेर गेली होती. त्यामुळे रविवारी करुणा ही खोलीत एकटीच होती. तिची मैत्रीण सायंकाळी खोलीत आली. तिला खोलीचे दार आतून बंद असल्याचे दिसले. बराच वेळ तिने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिने घराची मालकीण असलेल्या आजीला कळविले. दोघींनी खोलीच्या मागच्या दरवाजातून डोकावून पाहिले असता करुणाने गळफास घेतल्याचे दिसले.

Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”

हेही वाचा – जयंत पाटील यांच्या अनुकूलतेनंतरच भाजप प्रवेशाचा निर्णय! एकनाथ खडसे यांचा दावा

हेही वाचा – दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ

घटनेची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. उपनिरीक्षक अरुण मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. तिने आत्महत्या करण्यामागचे कारण उघड झालेले नाही. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत विद्यार्थिनीच्या मागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. मोलमजुरी करून तिचा परिवार उदरनिर्वाह करीत आहे.