योजनेची अपूर्ण कामे मार्चअखेपर्यंत पूर्ण करण्याची केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जल जीवन योजनेंतर्गत जिल्ह्यात अपूर्ण असलेली कामे उन्हाळय़ात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्याआधी म्हणजेच मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकच्या मुख्य अभियंत्यांना केली. जलजीवन योजनेंतर्गत विविध विषयांवर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची दूरदृश प्रणालीव्दारे आढावा बैठक डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जलशक्ती मंत्रालयाव्दारे जलजीवन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येत असतो. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, बागलाण, मालेगाव, येवला, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यातील प्रस्तावित आणि नवीन पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना प्रस्तावित नवीन १६१२ योजनांचा आढावा घेण्यात आला. एकूण १६१२ योजनांपैकी केवळ १७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून १०२९ योजनांच्या कामांची अंदाजपत्रके तयार असल्याची माहिती या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिकच्या मुख्य अभियंत्यांनी या वेळी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deadline water life work ysh
First published on: 18-01-2022 at 02:00 IST