जळगाव महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तपदाचा तिढा निर्माण झाला आहे. आता आयुक्त कोण, या विषयाचा निर्णय पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर पडला आहे.सध्या कार्यरत आयुक्त देविदास पवार यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यावर बाजू मांडण्यासाठी डॉ. विद्या गायकवाड यांनी मुदत मागितली असून, त्यावर पाच जानेवारी रोजी कामकाज होणार आहे. मात्र, आयुक्त पवार यांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेता येणार नाहीत. प्रशासकीय कामकाज व फायलींचा निपटारा त्यांना करता येणार आहे.

हेही वाचा >>>नाशिक : ब्रम्हगिरी परिसरातील बांधकामाविरुद्ध साधु-महंत आक्रमक; काम बंद पाडले

Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
msrtc, ST Corporation, Extends, Free Travel Facility, Retired, Employees, Spouses, marathi news, maharashtra,
आनंद वार्ता! निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय…
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद

राज्य शासनाने डॉ. विद्या गायकवाड यांना तडकाफडकी आदेश काढत आयुक्तपदावरून कार्यमुक्त केले होते. त्यांच्या जागी परभणी येथील देविदास पवार यांची नियुक्ती केली. डॉ. गायकवाड यांची पदस्थापना केली नव्हती. म्हणून डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात धाव घेत नूतन आयुक्त पवार यांच्या नियुक्ती आदेशाला स्थगिती मिळविली होती. मात्र, याबाबत नऊ डिसेंबर रोजी कामकाज झाले होते. यावेळी राज्य शासनाकडून त्यांची बाजू तसेच प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणासमोर सादर केले, तर आयुक्त पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली होती.

हेही वाचा >>>नाशिक : मुसळगावजवळील अपघातात दोन साईभक्तांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी आयुक्त पवार यांच्याकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. शासनातर्फे मुख्य सादरकर्ता अधिकारी मिलिंद महाजन, आयुक्त पवार यांच्यातर्फे अ‍ॅड. सिद्धेश्‍वर ठोंबरे, तर डॉ. गायकवाड यांच्यातर्फे अ‍ॅड. अविनाश देशमुख यांनी कामकाज पाहिले.