मालेगाव येथील रेणुकादेवी सहकारी सूतगिरणी उभारणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अखेर अटक झाली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस हिरे यांच्या मागावर होते. त्यानुसार बुधवारी पहाटे भोपाळ येथून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे.
येथील द्याने भागात उभारण्यात आलेल्या हिरे कुटुंबियांशी संबंधित सूतगिरणीसाठी १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी ४३ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने ३१ कोटीच्यावर थकबाकीची रक्कम गेली. कर्जफेड न झाल्याने बँकेने सूत गिरणीची तारण मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तेव्हा प्रकल्पाचे बांधकाम आणि यंत्रसामुग्री हे आराखड्यानुसार नसल्याचे तसेच सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम हिरे कुटुंबाशी संबंधित व्यंकटेश सहकारी बँकेत वळती करण्यात आल्याची बाब बँकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे गेल्या मार्च महिन्यात येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात या दोन्ही संस्थांच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयितांमध्ये माजीमंत्री प्रशांत हिरे, स्मिता हिरे, अपूर्व हिरे, अद्वय हिरे अशा एकूण २७ जणांचा समावेश आहे. अद्वय वगळता अन्य सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केलेला आहे. मात्र,अद्वय यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत होते. नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी भल्या पहाटे अद्वय यांना भोपाळ येथून ताब्यात घेतले.

Cafe Mysore
मुंबईतल्या कॅफे मैसूरच्या मालकाला २५ लाखाला लुबाडलं, ‘स्पेशल २६’ स्टाईल दरोडा
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
Kolhapur Municipal Officer, Kolhapur Municipal Officer Suspended, Unauthorized Tree Felling, Unauthorized Tree Felling in Padmaraje Park, Kolhapur news, Kolhapur municipalitya, marathi news,
कोल्हापूर महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे निलंबित; पद्माराजे उद्यान्यातील वृक्षतोड प्रकरण भोवले
What Sunil Shelke Said?
सुनील शेळकेंचं रोहित पवारांना उत्तर, “खंडोबाच्या पायथ्याशी मटणाच्या गाड्या रिकाम्या करणाऱ्यांनी आम्हाला..”
ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा
farmers, loan waiver, Nagpur High Court,
शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रखवालदाराचा मृत्यू

हेही वाचा… दिवाळीची सुटी असूनही लाच घेण्यासाठी कार्यालय गाठले, अन… जळगाव जिल्ह्यातील प्रकार

शिक्षण संस्थांच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी हिरे कुटुंबाच्या सदस्यांविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मात्र एकमेव अद्वय यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.