scorecardresearch

Premium

धुळ्यात जिंदाल स्टिलच्या नावाने बनावट कारखाना, मालक ताब्यात

नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का वापरुन येथील चाळीसगाव रोडवरील एका कारखान्यात लोखंडी पट्ट्या बनविण्याचा गैरप्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

Fake factory in the name of Jindal Steel in Dhule owner arrested
या कारवाईत २० हजार ६५० किलो वजनाचे एकूण १८६ लोखंडी पट्ट्यांचे गठ्ठे मिळून आले. (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता वार्ताहर

धुळे – नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का वापरुन येथील चाळीसगाव रोडवरील एका कारखान्यात लोखंडी पट्ट्या बनविण्याचा गैरप्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. या कारवाईत २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कारखाना मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

New Town on Green Belt in Navi Mumbai The reservation of park in the municipal development plan has been cancelled
नवी मुंबईतील हरित पट्ट्यावर नवे नगर; शिळच्या सीमेलगत नागरी वसाहतींचा मार्ग मोकळा
Construction developer in Thane Kaustubh Kalke is arrested
ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक
fire breaks out shiravane midc under construction building navi mumbai
नवी मुंबई : निर्माणाधीन इमारतीला आग तीन तासांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण
The Bombay International Airport Limited Company claimed in the High Court that it was planning to demolish the buildings in the Air India Colony at Kalina
कलिना येथील एअर इंडिया वसाहतीतील १०५ पैकी केवळ १९ इमारतीच पाडण्याची योजना; मुंबई आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणाचा उच्च न्यायालयात दावा

येथील शंभर फुटी रोडवरील कारखान्यात नामांकित जिंदाल स्टिल कंपनीच्या नावाचा शिक्का मारुन लोखंडी पट्ट्या बनविल्या जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अधीक्षक श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत निरीक्षक शिंदे, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, उपनिरीक्षक अमरजित मोरे, हवालदार.मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, शोऐब बेग, राजू गिते यांच्या पथकासोबत संबंधित कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी कारखान्यात घरात पीओपी करण्यासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी पट्ट्या बनवून, त्या पट्ट्यांवर जिंदाल स्टिल कंपनीचा शिक्का मारला जात होता. यावेळी पोलिसांनी मालक मुक्तार खान शहजाद खान याला ताब्यात घेतले. हा तयार माल जिंदाल कंपनीच्या नावाने बाजारात विक्री केला जात होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

आणखी वाचा-नंदुरबारमध्ये देशातील पहिली सिकलसेल स्कॅनिंग प्रयोगशाळा, पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

या कारवाईत २० हजार ६५० किलो वजनाचे एकूण १८६ लोखंडी पट्ट्यांचे गठ्ठे मिळून आले. त्यांची किंमत एकूण १८ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे. चार लाख रूपये किंमतीचे लोखंडी यंत्र, निलकमल कंपनीचे दीड लाख रुपयांचे प्रिंटर मशिन, ५० किलो वजनाचा पत्र्याचा साडेचार हजार रूपये किंमतीचा गोलाकार गठ्ठा, दोन हजार रुपयांच्या २० सिलींग पट्ट्या असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात हवालदार मच्छिंद्र पाटील यांचे फिर्यादीवरून मुख्तार खान विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake factory in the name of jindal steel in dhule owner arrested mrj

First published on: 05-12-2023 at 14:55 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×