नाशिक : वडिलोपार्जित जमिनीवरून वडील आणि मुलांमध्ये होत असलेल्या वादात वडिलांनी रागाच्या भरात मुलाचा खून केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्दारका येथील जयश्री माळवा  वैद्यनगर परिसरात कु टूंबियासह राहतात. त्यांचे पती प्रभाकर यांनी देवळा येथे कल्पना हिच्या सोबत विवाह के ला. जयश्री यांना एक मुलगा आणि दोन मुली तर, कल्पना यांना दोन मुलगे आहेत.

प्रभाकर यांच्या दुसऱ्या लग्नाला जयश्री यांच्या कुटूंबियांचा विरोध होता. प्रभाकर यांनी आपली वडिलोपार्जित जमीन कल्पना यांच्या नावावर के ली होती. यावरून जयश्री आणि प्रभाकर यांच्यात वाद होता. ही जमीन जयश्री यांचा मुलगा नीलेश नावावर करून मागत होता. यावरून वडील आणि मुलांमध्ये नेहमी भांडण होत असे.

रविवारी रात्री याच कारणावरून वाद झाला.  प्रभाकर यांनी या गोष्टीला नकार दिला. या प्रकारानंतर सर्वजण आपआपल्या खोलीत झोपले असतांना सोमवारी पहाटे प्रभाकर हे  नीलेशच्या खोलीत गेले. त्याचा गळा दाबत असतांना नीलेशने आरडाओरड के ला. हा आवाज ऐकू न जयश्री नीलेशच्या खोलीत धावल्या. त्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला. प्रभाकरने त्यांना जोरात ढकलून दिले. आणि नीलेशचा गळा दाबून त्याचा खून केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father kills son over land dispute zws
First published on: 05-01-2021 at 01:01 IST