इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील एकाच कुटूंबातील चौघांसह पाच सदस्यांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेले चौघे अल्पवयीन आहेत. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिकरोड येथील गोसावी वाडीत राहणारे खान कुटूंबिय रिक्षातून मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.

हेही वाचा >>> नाशिक : पेठरोडवर पाच मोटारसायकलींसह रिक्षाची तोडफोड

Gulanchwadi, truck, funeral crowd,
पुणे : अंत्यविधीतील गर्दीत भरधाव ट्रक घुसला; चिरडून तीन जणांचा मृत्यू
Navi Mumbai Police, Kharghar, Mobile shop theft, Juveniles detained, Stolen goods recovered CCTV footage, Criminal Investigation Department, kharaghar news, navi Mumbai news, latest news,
खारघर येथील चोरी प्रकरणात पावणेचार लाखांच्या मुद्देमालासह तीन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात 
hsbc flexi cap fund marathi news
‘फ्लेक्झीकॅप’मधील दोन दशकांचा साथीदार
Ghatkopar hoarding collapse
घाटकोपर फलक दुर्घटना : ३,३०० पानांचे आरोपपत्र दाखल
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
police, pune, drunk drivers,
पुणे : मद्यपींकडून पोलिसांच्या तिजोरीत कोट्यवधींची भर, दीड महिन्यात १६८४ जणांवर कारवाई; १२ कोटींचा दंड वसूल
Mhasrul, Murder, old woman,
नाशिक : म्हसरुळमध्ये वृद्धेची हत्या, संशयित ताब्यात
Hathras Stampede Accident Bholebaba Statement
हाथरस प्रकरणी भोलेबाबांची प्रतिक्रिया, “चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंचं अतीव दुःख, समाजकंटकांना…”

सायंकाळी सहाच्या सुमारास अनस खान (१५), नाझिया खान (१५), मिस्बाह खान (१६), हनिफ शेख (२४), ईकरा खान (१४) हे धरणाच्या पाण्यात खेळत होते. खेळत असतांना खोलीचा अंदाज न आल्याने एकजण बुडू लागल्यावर त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाचही जण बुडाले. मुलांच्या आईने आरडाआरेड केल्यानंतर स्थानिक मदतीला धावून आले. स्थानिकांच्या मदतीने पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहेत.