नाशिक : शहरात पाच वर्षांपूर्वी झालेल्या वाघ या भेळभत्ता विके्रत्याच्या खून प्रकरणात फरार संशयितास अटक करण्यात आली आहे. पंचवटी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. पंचवटी पोलिसांकडून अभिलेखावरील हव्या असलेल्या आणि फरारी संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. अद्यापपावेतो उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह््यांचाही तपास सुरू आहे.
याअंतर्गत वाघ भेळभत्ता विके्र त्याच्या खून प्रकरणातील संशयित आणि पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रवींद्र परदेशी या संशयिताचा शोध घेणे सुरू करण्यात आले. या प्रकरणातील इतर २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी परदेशी त्यांना सापडत नव्हता. पंचवटी पोलिसांना परदेशी हा दिंडोरी परिसरात कु टुंबातील अन्य सदस्यांसमवेत राहत असल्याची माहिती मिळाल्यावर दिंडोरी तालुक्यातील जोरण परिसरात तीन दिवस पोलीस दबा धरून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो बेसावध असताना त्याला अटक के ली. परदेशीने गुन्हा के ल्याची कबुली दिली असून या प्रकरणात दोन मुलगे, एक पुतण्या आणि अन्य १७ जणांचा समावेश असल्याची माहिती त्याने दिली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर के ले असता २७ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.