नांदेड : नांदेडहून भोकरकडे येणाऱ्या टाटा मॅजिक व वीट टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले असून, अन्य चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (१९ जून) दुपारी चारच्या सुमारास भोकर-नांदेड रस्त्यावरील सीताखांडी घाटात घडली.
नांदेडहून प्रवासी वाहतूक करणारी गाडी सीताखांडी घाटात आली असता, वीट भरून आलेल्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात भुलाबाई गणेश जाधव (वय ४५, रा. पोटा तांडा), संदीप किशनराव किसवे (वय २६, रा. हाळदा), संजय इरबा कदम (वय ४८, रा. हिमायतनगर), बापूराव रामसिंह राठोड (वय ५७, रा. पाकीतांडा) यांचा मृत्यू झाला असून,देविदास गणेश जाधव, परमेश्वर केशव महाजन, कैलास
गणपत गडमवाड, मंगेश गोविंद डुकरे हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही गाडय़ांचा घटनास्थळावर अक्षरश: चुराडा झाला.