धुळे-पिंपळनेर (ता.साक्री) येथे चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोने,चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.याप्रकरणी दोन बालकांसह अन्य दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती बुधवारी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांना दिली.

हेही वाचा >>>नाशिक : प्रतिबंधित निकोटीनयुक्त ८८ हजारांचे इ सिगारेटचे खोके जप्त

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
fraud of Jewellery worth rupees crores in thane
ठाण्यात सराफा दुकानात कर्मचाऱ्याकडून कोट्यवधींच्या दागिन्यांचा अपहार

पिंपळनेर शहरातील राजेसंभाजी नगर येथे जयेश देवरे यांचे घर आहे.१५ डिसेंबर रोजी त्यांच्या घरी रात्री तर २२ डिसेंबर रोजी बालाजी नगर मधील प्लॉट नं १४ येथील रहीवासी संदिप शिंदे यांच्याकडे चोरी झाली.शिंदे हे आयुर्विमा प्रतिनिधी असल्याने ते व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेले होते.त्यांच्या बंद घराचे मागील दरवाजाचे कुलूप तोडुन चोरांनी ऐवज लांबविला होता.

या दोन्ही ठिकाणी झालेल्या चोऱ्यांची नोंद पोलिसांनी केली होती.पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हददीत होणाऱ्या घरफोड्या आणि चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड व अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांनी गुन्हे अन्वेषण आढावा बैठकीत विशेष अधिकाऱ्यांना तपास पथके नेमण्याबाबत सुचना दिल्या होत्या.प्रामुख्याने रात्रीच्या वेळी होणा-या घरफोडी चो-यांना प्रतिबंध घालसाठी रात्रगस्त वाढविण्यात आली होती.नितिन ऊर्फ राजुभाई पवार ( घोडयामाळ, इंदिरानगर पिंपळनेर), विक्की उर्फ विवेक बच्छाव (१९ ,रा इंदिरानगर पिंपळनेर), प्रथम ऊर्फ नानु नगरकर ( १८, रा. नानाचौक पिंपळनेर) यांच्या सोबत अन्य दोन मुलेही घरफोडी आणि चो-या करीत असल्याचे कळाले.

हेही वाचा >>>नाशिक : काँक्रिटीकरणामुळे रामकुंडातील अस्थिंचे अविघटन, देवांग जानी यांचा दावा

या माहितीची खात्री केल्यावर पोलिसांनी विक्की उर्फ विवेक बच्छाव आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले.त्यांनी दिलेल्या माहितीवरून या टोळीचा म्होरक्या नितिन ऊर्फ राजुभाई पवार हा असल्याचे निष्पन्न झाले आहे.तो फरार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पवार हा दिवसभरात कॉलनी परिसरात फिरुन बंद घराची टेहळणी करीत असायचा.अशी माहिती पोलिसांना देण्यात आली.पवार याने सुचविल्याप्रमाणे इतरांनी घरफोडी,चोऱ्या केल्या ची माहिती देण्यात आली.

संशयितांनीही घरफोडी,चोरी गुन्हे केल्याची कबुली दिल्याने हे गुन्हे उघडकीस आले आहेत.चोरी केलेले सोन्याचांदीच्या दागीन्यासह रोख रक्कम तसेच मोबाईल असा ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत करण्यात केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी नगरकर, बच्छाव यांना अटक केली असून मुख्य साथीदारु पवार हा फरार आहे.दोन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>जळगाव : मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांचे आवाहन

पिंपळनेर शहरातील तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हददीतील सर्व गावातील रहिवाशांनी गावी जात असतांना आपल्या घराच्या पुढील आणि व मागील भागात रात्री लाईट लावावेत.सोन्या चांदीचे दागीने, रोख रक्कम घरात न ठेवता बॅन्क अगर इतर सुरक्षीत ठिकाणी ठेवावी.आजुबाजुला कॉलनी किंवा घर परिसरात कोणीही संशयीत व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा ११२ या क्रमांकवर संपर्क करुन माहीती द्यावी , असे आवाहन केले आहे