यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मुक्त कृषी शिक्षणाच्या चळवळीची राष्ट्रीय पातळीवरून दखल घेण्यात आली असून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मुक्त कृषी शिक्षण कार्यशाळेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा गौरव करण्यात आला. मुक्त विद्यापीठाच्या वतीने कृषी विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ यांना विशेष समारंभात पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. पंजाब सिंग यांनी यावेळी समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणतानाच त्यांचे उच्च शिक्षणाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करीत असलेले ज्ञानदानाचे कार्य वाखाणण्याजोगे असल्याचा उल्लेख केला.