लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याप्रमाणे धनगर समाजाचे नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे जाहीर सभेत फारसे कुठे दिसत नाहीत. या संदर्भातील प्रश्नावर पडळकर यांनी हसत शनिवारी प्रचारात होतो, असे नमूद करुन फारसे बोलणे टाळले.

Ajit Pawar, NCP, Marathwada,
मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चलबिचल
Shivsena, Naresh Mhaske,
शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणतात, काहींनी जाहीरपणे नाही पण मैत्री निभावली; समाजमध्यमांवरील संदेशामुळे खळबळ
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : अजित पवार गटाच्या मर्यादा स्पष्ट
Andhra Pradesh Muslim Reservation
“आंध्रात मुस्लीमांचे आरक्षण कायम राहणार”, टीडीपीच्या नेत्याची स्पष्ट भूमिका; भाजपाची कुचंबणा?
Jayant Patil
“पिपाणी चिन्हामुळे आम्हाला…”, जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, “साताऱ्याची जागा…”
mysterious mandate that does not look at development Lok Sabha election results announced
विकासाकडे न पाहणारा अनाकलनीय जनादेश
lokjagar
लोकजागर : निवडणूक आख्यान – चार
Kangana Ranaut devniti in Himachal How Lunn Lota age-old traditions enter campaign
कंगना रणौतच्या मतदारसंघात लूण लोटा प्रथेची चर्चा; देवाची भीती दाखवून केला जातोय प्रचार

शनिवारी शहरात धनगर समाजाचा स्नेहमेळावा पार पडला. जाहीर सभेत ते दिसत नसले तरी अशा मेळाव्यांतून ते महायुतीचा प्रचार करीत आहेत. ओबीसी नेते भुजबळ हे देखील महायुतीच्या प्रचार सभांमध्ये व्यासपीठावर दिसत नाहीत. याबद्दल मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते ओबीसी कार्यकर्त्यांच्या दृकश्राव्य माध्यमातून बैठका घेत असल्याचे म्हटले होते. धनगर समाजाचे नेते पडळकर यांचाही वेगळ्या पध्दतीने प्रचार सुरू असल्याचे समोर आले आहे.

आणखी वाचा-काँग्रेसचे माजी नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे भाजपमध्ये

रविवारी त्यांनी भुजबळ फार्म येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भुजबळ यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बंद दाराआड चर्चा केली. शनिवारी शहरात धनगर समाजाचा स्नेहमेळावा होता. त्यासाठी नाशिकमध्ये आल्याचे पडळकर यांनी नमूद केले. भुजबळ यांची भेट घेण्याचे कुठलेही विशेष कारण नाही. नाशिकमध्ये आल्यामुळे महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घ्यायला हवी म्हणून आलो होतो. निरपेक्ष भावनेतून ही भेट होती. महायुतीचे ज्येष्ठ नेते भुजबळांना भेटत असले तरी त्यांची भेट आणि तो विषय पूर्णपणे वेगळा असतो. आपण सामान्य, चळवळीतील कार्यकर्ते असून आपली ही भेट वेगळी असल्याचे त्यांनी सूचित केले.

भुजबळ यांच्या पाठिशी ओबीसींची मोठी ताकद आहे. त्यांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. भुजबळ यांच्यावर कोणीच वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यांच्यामागे मोठी ताकद असून ती भविष्यात वाढतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.