नाशिक: पंचवटीत पेठरोड परिसरातील एरंडवाडीत मंदिराजवळ एका पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या. कवट्या प्लास्टिकच्या बनविण्यात आल्या असून संशयित अघोरी विद्याच्या पूजेसाठी वापरत असल्याची माहिती पंचवटी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

रविवारी सकाळी एरंडवाडीतील एका मंदिराजवळ पोत्यात पाच ते सात मानवी कवट्या आढळल्या. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी जावून पोते ताब्यात घेतले. कवट्यांची पाहणी केली असता त्या प्लास्टिकपासून बनविल्याचे आढळून आले. याविषयी पोलीस निरीक्षक कड यांनी माहिती दिली. कवट्या मानवी नसून प्लास्टिकपासून तयार केलेल्या आहेत. जवळील मंदिरात संशयित काळी जादू किंवा अघोरी विद्यासाठी या कवट्यांचा वापर करीत होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे कड यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिक: पंचवटीत रिक्षाचालकाची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयिताचे नाव नीलेश थोरात (३८, रा. पंचवटी) असे आहे. गळ्यात कवट्यांची माळ टाकून अलौकिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा त्याच्याकडून करण्यात येतो. अघोरी प्रथांचा वापर करुन इतरांनाही तसे करण्यास प्रवृत्त करत असल्याचे थोरातने सांगितले. चमत्कार दाखवत पैसे उकळत असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.