जळगाव : केंद्र आणि राज्य सरकारकडून कृषिविषयक मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षांनी चोपडा येथे गळ्यात कांद्याची माळ घालून मतदानाचा हक्क बजावला.

जळगाव, रावेर या लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी नऊपर्यंत जळगाव मतदारसंघात ६.१४ टक्के, तर रावेर मतदारसंघात ७.१४ टक्के मतदान झाले. सकाळी तुरळक गर्दी होती. मात्र, नऊनंतर मतदान केंद्रांत रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील जळगाव मतदारसंघात २०, तर रावेर मतदारसंघात २९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. दोन्ही मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीतच खरी लढत रंगत आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील तीन हजार ८८६ मतदान केंद्रांत मतदारांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. जळगाव मतदारसंघात एक हजार ९८२ आणि रावेर मतदारसंघात एक हजार ९०४ मतदान केंद्रे असून, त्यात २१ अपंग मतदान केंद्रे, ३३ महिला मतदान केंद्रे, ११ युवा मतदान केंद्रे, आणि ५५ आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

raigad school student holiday marathi news
रायगड जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी
Ajit Pawar, NCP, BJP, local body elections, municipal elections, district council elections,mahayuti , Maharashtra politics, political strategy, vidhan Sabha elections, party growth, Shiv Sena, Congress, Maha vikas Aghadi,
अजित पवारांची स्वबळाची घोषणा का ?
Govt orders inquiry into resort on tribal land in bahul district Nagpur
आदिवासींच्या जमिनीवर रिसोर्ट, सरकारचे चौकशीचे आदेश
Regional offices, MIDC, Akola,
राज्यात अकोल्यासह सात जिल्ह्यांत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, ९२ नवीन पदांची…
wai firing case
वाई: गोळीबारातील मुख्य संशयिताला अटक
case filed against shiv sena shinde group district chief for threat and extortion contractor
शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुखावर ठेकेदाराला धमकावत खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल
IT hub, Satara Shirwal,
सातारा शिरवळ येथे आयटी हब, तर पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत – उदय सामंत
Pune accident case Vishal Agarwal arrested in another crime
पुणे : विशाल अगरवालला आणखी एका गुन्ह्यात अटक

हेही वाचा – प्रचार सभांमध्ये दिसत नसल्याविषयीच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकर का हसले…

हेही वाचा – नाशिकची जागा वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कसोशीने प्रयत्न; संस्था, संघटनांच्या प्रमुखांशी संवाद

केंद्र परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना यादीतील नाव शोधण्यासाठी मदतकार्य सुरू होते. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी नऊनंतर सूर्यदर्शन झाले. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खाली सरकला होता. मात्र, दुपारी ऊन वाढल्यावर मतदानाची गती आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन यांनी सकाळी सातला ओरियन स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे शेतीमालाच्या हमीभावासंदर्भात शेतकर्‍यांमध्ये रोष आहे. कापूस, कांदा यांसह सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी उठवावी, यासाठी निषेध म्हणून गळ्यात कांद्याची माळ घालून शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी मातोश्री शोभाबाई पाटील यांच्यासह मतदान केले.