नाशिक: महामार्गावरील टोलनाका परिसरात मार्गिका बदल करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसची पाठीमागून धडक बसल्याने चालक व वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात झाला. जखमी चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील आहेत

पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगाराची बस जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोल नाका परिसरात मार्गिका बदलत असताना पुढे असलेल्या रसायनाच्या टँकरला या बसची पाठीमागील बाजूस जोरदार धडक बसली. वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती असून या जोरदार धडकेत बसमधील चालक, वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी झाले. त्यांना पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य केले.

Sinnar, Sinnar industrial estate,
वीज केंद्रातील बिघाडाने सिन्नर औद्योगिक वसाहतीला झळ, तीन दिवस पाणी पुरवठा ठप्प
Recruitment, Tribal Development Department,
आदिवासी विकास विभागातील पदभरती तूर्त स्थगित; सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाच्या समावेशाची सूचना
dress , teachers, Nashik,
गडद, विचित्र नक्षीकाम, चित्र असणाऱ्या पेहरावास मज्जाव, नाशिक मनपा प्रशासनाधिकाऱ्यांची शिक्षकांना सूचना
Case against then in charge principal in case of embezzlement of lakhs in government industrial training institute
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाखोंचा अपहार; तत्कालीन प्रभारी प्राचार्यांविरुध्द गुन्हा
राज्य पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे निलंबित, दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्य सरकारची कारवाई Govt suspends archaeology dept director involved in bribery case
राज्य पुरातत्व खात्याचे संचालक तेजस गर्गे निलंबित, दीड लाखांच्या लाच प्रकरणात राज्य सरकारची कारवाई
21 candidates for teachers constituency NCPs candidacy has caused a breakdown in mahayuti
नाशिक : शिक्षक मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात, राष्ट्रवादीच्या उमेदवारीने महायुतीत बिघाडी
Death of a young man caught in the act of cutting wood
लाकूड कापण्याच्या पात्यात सापडून तरुणाचा म़ृत्यू
Electricity supply in Nashik Road area has been interrupted for three days
नाशिकरोड परिसरातील वीज पुरवठा तीन दिवसांपासून खंडित – शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव
State Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil brother Dr Rajendra Vikhe Patil withdrew from the Nashik Division Teachers Constituency
महायुतीविषयी महसूल मंत्र्यांच्या बंधूंची नाराजी; निवडणुकीतून माघार, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ

हेही वाचा : लांब चोचीच्या गिधाडाचे ३४ वर्षानंतर जळगाव जिल्ह्यात दर्शन

जखमी प्रवाशांमध्ये गणेश निकम, जयश्री निकम, प्रशांत निकम, लक्ष्मण बाविस्कर, विमल वाणी, दिनेश अहिरे, राजेंद्र पाटील, सुरेखा येवले, हितेश आहेर, (सर्व रा.चाळीसगाव), निकिता विशाल, संतोष कुमार पांडे, वैभव कुमावत, अविनाश राठोड, प्रकाश अमृतकर, मंगला रायते (सर्व रा. नाशिक), गायत्री बैरागी, पूजा पवार, मनीषा पवार, भूमी बैरागी, संध्या बैरागी, कोमल बच्छाव, संगीता बरगडे, गोपाळ खैरनार, योगेश खैरनार, प्रदीप खैरनार, गफ्फार शेख, रजिया शेख (सर्व रा. मालेगाव) आदिंसह चालक, वाचकाचा जखमीत समावेश आहे.