नाशिक : बंदुकीचा धाक दाखवून गोदावरीवरील बापू पुलाजवळून एका व्यावसायिकाचे अपहरण करून साडेबारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून सहा लाखहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली. सोमवारी अपहरणाची ही घटना घडली होती. राजेशकुमार गुप्ता या फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत टोळक्याने मोटारीतून अपहरण केले. गुप्ता यांच्या एटीएमचा वापर करून ३० हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच गुप्ता यांच्या पत्नीकडून १२ लाखांची खंडणी उकळण्यात आली. दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशातील देवास येथे गुप्ता यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : नंदुरबारमध्ये आदिवासींना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसची खेळी, राहुल गांधी यांच्या यात्रेचे ‘आदिवासी न्याय यात्रा’ नामकरण

Video of tiger eating hidden prey in Navegaon buffer area
Video : ‘छोटा मटका’च्या वारसदाराने शिकार ठेवली लपवून, संधी मिळताच मारला ताव…
builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण
Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट एकला मार्गदर्शन केले. या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी संशयितांना पकडण्यासाठी दोन पथके तयार केली. एका पथकाने आदित्य सोनवणे (२४, म्हाडा कॉलनी, अंबड लिंक रोड) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मोटारसायकल, महागडा भ्रमणध्वनी, सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे एक लाख ५९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दुसऱ्या पथकाने तुषार खैरनार (२८, सिध्दी अपार्टमेंट, म्हसरूळ) आणि अजय प्रसाद (२४, अंबड लिंक रोड) या दोघांना सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून मोटार, भ्रमणध्वनी असा तीन लाख ८७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या संशयितांना पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक : गोदावरीतील जलपर्णी जिवावर, पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक विष्णू उगले, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, हवालदार मंगेश साळुंखे, प्रदीप म्हसदे, नाझीम पठाण, विशाल काठे, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.