डोलणाऱ्या हत्तींची महाकाय प्रतिकृती.. खुल्या मैदानात सुरू असलेला विलक्षण ‘लेझर शो’.. रंगबेरंगी फुलपाखरांच्या आकारातील बैठक व्यवस्था.. ही वैशिष्टय़े आहेत पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिका आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या जवाहरलाल नेहरू वन उद्यानाची.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या उद्यानाची संकल्पना मांडली होती. त्यातून वनौषधी उद्यानाचे नुतनीकरण करण्यात आले. या उद्यानाचे वेगळेपण प्रथमदर्शनी लक्षात यावे यासाठी खास भव्य फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक विद्युत रोषणाईची व्यवस्था असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. त्याचा दरवाजाच ४० फुटांचा आहे.   उद्यानात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी फुलपाखरांच्या आकाराची आसन व्यवस्था निसर्गप्रेमींना खुणावते. या उद्यानाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे खुल्या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये दाखविण्यात येणारा ‘लेझर शो’. या कक्षाला ‘कथा अरण्याची’ असे नाव देण्यात आले आहे. देशात व अशिया खंडातही आधुनिक तंत्राचा वापर करून निर्मिलेला हा एकमेव लेझर शो आहे. त्याची कार्यप्रणाली स्वयंचलीत आहे. गर्दीच्या वेळी तो स्वयंचलीत होईल. त्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही.  टाटा ट्रस्ट व महापालिका यांनी उपक्रमांची जबाबदारी घेतली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laser show in botanical garden in nashik
First published on: 29-12-2016 at 01:19 IST