नाशिक : रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यातील दुसरी मोठी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेतील नवनिर्वाचित पदाधिकारी दीड महिन्यांपासून गावोगावी निव्वळ सत्कार स्वीकारण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. निकाल जाहीर झाल्यापासून आजतागायत नवीन कार्यकारिणी ५० हून अधिक सत्कार सोहळ्यांमध्ये सहभागी झाल्याचे सांगितले जाते. संस्थेसमोर अनेक अडचणी आणि आव्हाने असल्याचे चित्र संबंधितांनी रंगविले आहे. या स्थितीत संस्थेच्या कामापेक्षा सत्कार सोहळ्यात रममाण होण्यास अधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ऑगस्ट अखेरीस मविप्र संस्थेची निवडणूक पार पडली. अतिशय चुरशीच्या लढतीत अध्यक्षपद वगळता उर्वरित सर्व २० जागांवर सत्तारुढ प्रगती पॅनलची धुळधाण उडवत परिवर्तन पॅनलने बाजी मारली. संस्थेत प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व करणारे ॲड. नितीन ठाकरे हे विजयी झाले. अध्यक्षपदी प्रगतीचे सुनील ढिकले यांनी विजय मिळवला. उर्वरित सर्व जागांवर परिवर्तनने वर्चस्व राखले. प्रदीर्घ काळानंतर मविप्रमध्ये सत्तांतर झाले. या निकालाचे अनेकांना अप्रुप होते. त्यामुळे तेव्हापासून सुरू झालेली सत्काराची मालिका निकालास दीड महिने उलटूनही थांबलेली नाही. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नव्या कार्यकारिणीला सत्कारासाठी बोलाविले जात आहे. नव्या कार्यकारिणीत कार्यकारी मंडळ आणि तालुका प्रतिनिधी असे २१ पदाधिकारी आहेत. सत्ताधारी गटाच्या २० जणांनी जरी एकाच वेळी एखाद्या कार्यक्रमास हजेरी लावली तरी संस्था कार्यालय ओस पडते.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

हेही वाचा : तुम्हाला माहितीये का मोती साबण अन् दिवाळीचं नातं कसं जुळलं? हा साबण दिवाळीत वापरण्यास सुरुवात कधी झाली?

दीड महिन्यांत विविध संस्था, संघटना आणि तालुक्याच्या ठिकाणांहून आलेली ५० हून अधिक निमंत्रणे नव्या कार्यकारिणीने स्वीकारल्याचे सांगितले जाते. सभासदांचा आग्रह कुणाला मोडता आला नसावा. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचे त्या जोडीला स्वतंत्रपणे अनेक सत्कार झाल्याचे सांगितले जाते. याचा विचार केल्यास निकाल लागल्यापासून नवनिर्वाचित पदाधिकारी दररोज कुठे ना कुठे किमान एक तरी सत्कार स्वीकारत असल्याचे दिसत आहे.

१०९ वर्षांचा इतिहास लाभलेल्या मविप्रचे कार्यक्षेत्र नाशिक जिल्ह्यापुरते सिमित आहे. संस्थेची जिल्ह्यात ४८९ शाळा, महाविद्यालये आहेत. त्यात सव्वादोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षणाबरोबर राजकारणात संस्था परिणामकारक भूमिका निभावते. भविष्यातील गणिते लक्षात घेऊन पदाधिकारी सत्कार सोहळ्यांना नकार देण्यास बहुदा तयार नाहीत. अनेक गावांमधून पदाधिकाऱ्यांना बोलावणे येत आहे. काही सभासद, ग्रामस्थ सकाळीच घर, कार्यालयात ठाण मांडून आग्रह धरतात. तालुकास्तरीय अथवा चार ते पाच गावांचा मिळून एकत्रित सोहळा या धाटणीने सोहळ्यांचे आयोजन प्रगतीपथावर आहे. दिवसागणिक वाढत चाललेल्या सत्कारांनी संस्थेचे कामकाज कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : विद्यापीठाच्या निधीतून रस्ता बांधण्याचा घाट? ; नाशिकमधील प्रकार; दोन किमीचा मार्ग खड्डय़ांमुळे बिकट

अडचणी, आव्हानांचा विसर का ?

विजयी झाल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेवरील दायित्व आणि इतर देणी मांडत आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवले होते. त्यास पूर्वाश्रमीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर दिले. संस्थेसमोरील आव्हाने नमूद केल्यामुळे मराठा समाजाची ही संस्था अडचणीत येऊ नये म्हणून शरद पवार यांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून एक कोटींची देणगी जाहीर केली होती. दायित्व कमी करण्यासाठी समाजाकडून देणग्या गोळा करण्याचा सल्ला दिला होता. संस्थेची घडी नव्याने बसविण्याऐवजी नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार स्वीकारण्यात मग्न आहेत. त्यांना अडचणी, आव्हानांचा विसर पडल्याचा आक्षेप काही सभासद नोंदवितात.

हेही वाचा : नाशिक: कैलासनगर चौकातील अतिक्रमणांवर हातोडा; हॉटेल, १० दुकाने जमीनदोस्त

नव्या कार्यकारिणीचे आजवर १० ते १५ सत्कार सोहळे झाले असतील. त्याचा संस्थेच्या कामकाजावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. आपण स्वत: दररोज तीन तास संस्थेच्या कार्यालयात असतो. विविध कागदपत्रांवर दोन हजार स्वाक्षरी करतो. इतर पदाधिकाऱ्यांचे मुख्यालयात रोज काम नसते. महिन्यातून एकदा पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मध्यवर्ती कार्यालयामार्फत दैनंदिन कामे सुरू असतात. प्रवेश प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. जिथे गरज आहे तिथे आपल्यासह सभापती उपलब्ध असतात. बी. फार्मसीची मध्यंतरी कमी झालेली प्रवेश क्षमता पुन्हा ६० जागा म्हणजे पूर्ववत करण्यात आम्हाला यश आले. नवीन शिक्षणक्रम सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल केले जात आहेत. कंत्राटदारांची थकीत देयके दिली जात आहेत. – नितीन ठाकरे (सरचिटणीस, मविप्र शिक्षण संस्था)