‘तोपची’मध्ये नव्या-जुन्या तोफांचा मेळ

नाशिक : विविध क्षमतेच्या नव्या-जुन्या तोफांमधून होणारा भडिमार.. लाँचरमधून लक्ष्यभेद करणारे रॉकेट.. तोफगोळे आणि रॉकेटच्या माऱ्याने धुरात हरवलेला फायरिंग रेंजचा परिसर.. हेलिकॉप्टरमधून झेपावलेल्या पॅराट्रुपर्सच्या अवकाशातील कसरती.. युद्धभूमीवर तोफखान्याचा माऱ्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारी ‘साटा’ अर्थात टेहळणी-लक्ष्य निश्चिती विभागाची उपकरणे..

sex racket busted at unisex salon prostitution in guise of a unisex salon
युनिसेक्स सलूनच्या आड देहव्यापार – विवाहित महिलेची….
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?

भारतीय तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेची अनुभूती येथे नेपाळच्या लष्करी शिष्टमंडळाने घेतली. त्यास निमित्त ठरले, तोफखाना स्कूलतर्फे मंगळवारी आयोजित ‘तोपची ‘कार्यक्रमाचे. प्रदीर्घ काळापासून जुनाट तोफांवर विसंबून असणाऱ्या तोफखाना दलात आधुनिकीकरणाने वेग घेतल्याचे अधोरेखीत झाले. लष्कराच्या दक्षिणी मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल दिपेंदर सिंग आहुजा, तोफखाना स्कूल आणि तोफखाना रेजिमेंटचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर. एस. सलारिया, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी भारतीय लष्करी प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते.

देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात तोफखाना दलाची मुख्य भिस्त सांभाळणारी १५५ एम.एम. बोफोर्स, १२० एम.एम. मॉर्टर, इंडियन फिल्ट गन, सोल्टन या जोडीला नव्याने दाखल झालेल्या हलक्या वजनाची एम ७७७, स्वयंचलीत के-९ वज्र तोफाही सहभागी झाल्या. दलामार्फत नव्या-जुन्या तोफांचा मेळ घातला जात आहे. एकाचवेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असणारे १२२ एम.एम. मल्टीबॅरल रॉकेट लाँचर आणि चिता, चेतक हेलिकॉप्टरच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले.

पाहुण्यांना तोफगोळे डागून सलामी देण्यात आली. तोफखान्याच्या भात्यातील पिनाका, स्मर्च या रॉकेटचे सादरीकरण करण्यात आले. फायरिंग रेंजच्या परिसरात चिता हेलिकॉप्टरने अगदी जमिनीजवळून उडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. नंतर ध्रुव हेलिकॉप्टरमधून १० हजार फूट उंचीवरून पॅराट्रुपर्सने उडी मारून हवेतील कसरती सादर केल्या. तोफखाना दलाच्या टेहळणी आणि लक्ष्य निश्चिती विभाग (साटा)कडून वापरल्या जाणाऱ्या लोरोज, स्वदेशी बनावटीचे स्वाती यांसारख्या टेहळणी यंत्रणा सादर करण्यात आल्या.

तिघांच्या पाठीवर २३४ किलोची तोफ

तोफखाना दलाकडील मोर्टर वगळता उर्वरित सर्व तोफा किमान चार ते कमाल १२ टन वजनाच्या आहेत. अवजड तोफांच्या वाहतुकीसाठी लष्कराचे ताकदवान वाहन लागते. १२० एम.एम. मोर्टर ही तुलनेत कमी म्हणजे सव्वा दोनहून अधिक टनची आहे. वेळप्रसंगी ही तोफ हेलिकॉप्टरमधून अथवा तोफखान्याच्या जवानांकडून युध्दभूमीवर तैनात केली जाते. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. २३४ किलोची छोटेखानी तोफ वाहून नेणे अवघड असते. तोफेच्या दोन भागांचे वजन अनुक्रमे  ८०, ८६ किलो तर बॅरलचे वजन ६८ किलो इतके आहे. जवान प्रत्येकी एक भाग पाठीवर घेऊन मार्गक्रमण करतो. इच्छीतस्थळी सुटय़ा भागांची जुळणी लगेच केली जाते. अवघ्या काही मिनिटांत ती भडीमार करू लागते. हे यावेळी पहायला मिळाले. कोणाच्याही मदतविना २३४ किलो तोफेची वाहतूक तीन जवान करतात.

हल्ला चढवा.. अंतर्धान व्हा..

तोफगोळे डागताना शत्रुची रडार यंत्रणा आपल्या तोफांचा ठावठिकाणा शोधत असते. तोफांच्या माऱ्यावरून टेहळणी यंत्र ती माहिती देतात. शत्रुला तोफांची ठिकाणे समजली तर तो प्रतिहल्ला करू शकतो. तशी संधी त्याला मिळू नये म्हणून तोफांचा लक्ष्यावर भडीमार केल्यानंतर लगेच अंतर्धान पावण्याचे तंत्र सादर करण्यात आले. सहा बोफोर्स तोफा जलदपणे मैदानावर आल्या. लक्ष्यावर जोरदार हल्ला केल्यानंतर काही मिनिटांत गायब झाल्याचे दर्शविण्यात आले. ‘स्मोक बॉम्ब’द्वारे शत्रुला चकमा कसा देता येतो हे देखील सादर करण्यात आले.