नाशिक -राज्यात विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील वाद वाढत असून दररोज राजकीय आरोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमिवर शहरात शांतता कायम राहावी, यासाठी मंगळवारपासून १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती तापत असल्याने त्याचे पडसाद शहरात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमिवर शहर परिसरात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> १०९ शिक्षणक्रम अन् ३१ लाख उत्तरपत्रिका; मुक्त विद्यापीठाच्या लेखी परीक्षा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३ जूनपर्यंत हे आदेश लागु राहतील. या कालावधीत कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, शस्त्र, अस्त्र, तलवारी, दंडे वापरण्यास मनाई आहे, कोणत्याही व्यक्तींच्या चित्रांचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्याच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन, दहन करणे, मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता याला धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा अविर्भाव करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावणे यास मज्जाव करण्यात आला आहे.