नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि चालक अशा १७९ रिक्त पदांसाठी जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे निवड चाचणी सुरू आहे. १७९ पदांसाठी २१,०४९ अर्ज प्राप्त झाले असून १०२२ उमेदवार शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणीत पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या सुरू आहेत. लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असून त्याची तारीख नंतर उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा- ‘एकनाथ शिंदेंमुळे संजय राऊत खासदार’; हिंदू जनसंघर्ष मोर्चात गुलाबराव पाटील यांचा दावा

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया

पोलीस शिपाई पदाची १६४, तर चालक १५ रिक्त पदे आहेत. दोन जानेवारीपासून या रिक्त पदांसाठी चाचणी सुरू आहे. चालक पदासाठी दोन हजार ११४ तर, पोलीस शिपाईसाठी १८,९३५ अर्ज प्राप्त झाले. चालक पदासाठी एक हजार २४० तर, शिपाई पदासाठी तीन हजार ४२१ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. बरेच उमेदवार चाचणीच्या आधीच मैदानावर मुक्कामी येत असल्याने अशा उमेदवारांसाठी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे व्यवस्था करण्यात आली आहे. २० जानेवारीपर्यंत मैदानी चाचणी सुरू राहणार आहे. लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असून त्याची तारीख उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेसंदर्भात काही तक्रार असल्यास ९८२२९७४२५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.