वाढीव तिकीट दराचा भार वाढला; इंजिनजवळ दर्शनी भागातच भुसावळ-मनमाड -इगतपुरी मेमू रेल असा फलक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनमाड : उत्तर महाराष्ट्रांतील हजारो रेल्वे प्रवाशांना दोन वर्षांपासून प्रतिक्षा असलेली इगतपुरी – भुसावळ मेमू एक्स्प्रेसचे सोमवारी दुपारी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात आगमन झाल्यावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही गाडी सुरू झाल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. उद्घाटनानिमित्त मेमू  रेल्वेला आकर्षक सजावट करण्यात आली होती. इंजिनजवळ दर्शनी भागातच भुसावळ-मनमाड -इगतपुरी मेमू रेल असा फलक लावण्यात आला. पहिल्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकांतून या गाडीने २५ प्रवाशांनी प्रवास केला. १४३५ रुपये इतका महसूल रेल्वेला मिळाला. दुपारी ११ वाजून ५२ मिनिटांनी फलाट क्रमांक चारवर भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वेचे आगमन झाले. आणि प्रवाशांचा उत्साह द्विगुणित झाला. रेल्वे अधिकाऱ्यांसह प्रवासी  आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मेमूचे रेल्वे स्थानकांत स्वागत केले. महिला पदाधिकाऱ्यांनी या गाडीचे लोको पायलट, गार्ड आदींचे औक्षण केले. तर इंजिनच्या समोर नारळ वाढवून घोषणा देण्यात आल्या. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे अनेक रेल्वेगाडय़ा अद्यापही बंद आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers relieved launch express ysh
First published on: 11-01-2022 at 01:52 IST