धुळे – वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना ॲलोपॅथीचा औषधसाठा बाळगून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आणखी तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध धुळे जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सुहास वाघ (४३, रा.प्लॉट दोंडाईचा), राजु मलिक (रिटाणे, साक्री) आणि अमोल सूर्यवंशी (३६, नरव्हाळ,धुळे) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या बनावट डॉक्टरांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याने संयुक्तिकपणे ही कारवाई केली. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना किंवा शिक्षण नसताना या बनावट डॉक्टरांनी स्वतःजवळ ॲलोपॅथीचा औषधसाठा ठेवला होता, असा आरोप आहे.

builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

बनावट डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धिवरे यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पाच ते सात जानेवारी या कालावधीत धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली. या तपासणीत नव्याने आढळलेल्या तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक; दुबईतील कंपनीचा संचालक अटकेत, सायबर पोलिसांची कारवाई

यापूर्वीच्या तपासणीत जिल्ह्यात सात बनावट डॉक्टर आढळले होते. त्यांच्याविरुध्दही कारवाई करण्यात आली. बनावट डॉक्टर हे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत असतात. औषधांची मात्रा चुकल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे असतानाही बनावट डॉक्टर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिनधास्तपणे व्यवसाय करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.